Navi Mumbai : धक्कादायक! सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने लॉजमध्ये घेतला गळफास; 8 पानी नोट, अखेरचा व्हिडीओ शेअर करत सांगितलं कारण

Navi Mumbai : धक्कादायक! सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने लॉजमध्ये घेतला गळफास; 8 पानी नोट, अखेरचा व्हिडीओ शेअर करत सांगितलं कारण

नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने महापे येथील एका लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पांडुरंग निंबा पाटील असे आत्महत्या केलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून ते 56 वर्षांचे होते. आत्महत्येपूर्वी पाटील यांनी व्हिडिओ तयार करून समाजमाध्यमांवर व्हायरल केला होता. ज्यामध्ये त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. तसेच 8 पानांचे सुसाईड नोटीदेखील लिहिली असून त्यात आत्महत्याची कारणे आणि जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांची नावे आहेत. या घटनेमुळे नवी मुंबई पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

हेही वाचा : Manoj Jarange Patil : जरांगेंचे नवव्या दिवशीही उपोषण सुरूच, तर मुंबईला कधीही येऊ शकतो; पोलिसांना पत्राद्वारे इशारा

पांडुरंग पाटील हे नवी मुंबई पोलीस दलाच्या विशेष शाखेत कार्यरत होते. टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी त्यांनी दोन वेगवेगळे व्हिडिओ तयार केले. एका व्हिडिओमध्ये त्यांनी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याकडे न्यायाची आर्त हाक मारली आहे. यामध्ये त्यांनी एका माजी पोलीस उपायुक्त (डीसीपी), एक साहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) आणि एका हेड क्लार्कच्या नावाचा थेट उल्लेख करत त्यांच्या जाचाला कंटाळून हे पाऊल उचलत असल्याचे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्या मुलींची आणि जवळच्या नातेवाईकांची माफी मागत ‘मला माफ करा’, असे भावूक आवाहन केले आहे. पाटील यांचा हा व्हिडिओ सायंकाळी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस यंत्रणा तातडीने कामाला लागली आणि त्यांचा कसून शोध सुरू करण्यात आला. शोध मोहिमेदरम्यान महापे येथील ‘साची लॉज’मध्ये पाटील यांनी गळफास घेतल्याचे लॉजमधील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी आता पोलिसांतर्फे अधिक तपास करण्यात येत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version