हँगझोऊ, ७ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : चीनमधील हँगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई खेळांच्या स्पर्धेत अर्थात एशियाडमध्ये भारताने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आतापर्यंत भारताने १०७ पदके जिंकली आहेत. यात २८ सुवर्ण, ३८ रौप्य आणि ४१ कांस्य पदकांचा समावेश आहे. भारत पदक तालिकेत चौथ्या स्थानावर आहे. ही भारताची एशियाडमधील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.
१. टीम इंडिया (रुद्रांक्ष पाटील, ऐश्वरी प्रतापसिंह तोमर, दिव्यांशसिंग पनवार) – नेमबाजी – पुरुष दहा मीटर एअर रायफल संघ – सुवर्ण
२. टीम इंडिया (हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, ऋचा घोष, अमनजोत कौर, देविका वैद्य, पूजा वस्त्राकर, तीतस साधू, राजेश्वरी गायकवाड, मिन्नू मणी, कनिका आहुजा, उमा चेत्री, अनुषा बरेदी.) – क्रिकेट – महिला T२० क्रिकेट – सुवर्ण
३. टीम इंडिया (हृदय छेडा, अनुष अग्रवाला, दिव्यकृती सिंग, सुदीप्ती हाजेला) – घोडेस्वार – ड्रेसेज टीम – सुवर्ण
४. टीम इंडिया (मनू भाकर, रिदम सांगवान, ईशा सिंग) – नेमबाजी – महिला २५ मीटर पिस्तूल संघ – सुवर्ण
५. सिफ्ट कौर समरा – नेमबाजी – महिलांची ५० मीटर रायफल ३ पोझिशन्स – सुवर्ण
६. टीम इंडिया (अर्जुन चीमा, सरबज्योत सिंग, शिवा नरवाल) – नेमबाजी – पुरुष १० मीटर एअर पिस्तूल – सुवर्ण
७. टीम इंडिया (स्वप्नील कुशाळे, ऐश्वरी प्रताप सिंग तोमर, अखिल शेओरान) – नेमबाजी – पुरुषांची ५० मीटर रायफल 3 पोझिशन टीम – सुवर्ण
८. पलक गुलिया – नेमबाजी – महिला १० मीटर एअर पिस्तूल – सुवर्ण
९. रोहन बोपण्णा – ऋतुजा भोसले – टेनिस – मिश्र दुहेरी – सुवर्ण
१०. टीम इंडिया (सौरव घोसाळ, अभय सिंग, हरिंदर पाल सिंग, महेश माणगावकर) – स्क्वॉश – पुरुष – सुवर्ण
११. टीम इंडिया (कायन चेनई, जोरावर सिंग संधू, पृथ्वीराज तोंडैमन) – पुरुष संघ, ट्रॅप – सुवर्ण
१२. अविनाश साबळे – अॅथलेटिक्स – पुरुषांची ३ हजार मीटर स्टीपलचेस – सुवर्ण
१३. तजिंदरपाल सिंग तूर – अॅथलेटिक्स – पुरुषांचे शॉट पुट – सुवर्ण
१४. पारुल चौधरी – अॅथलेटिक्स – महिला पाच हजार मीटर – सुवर्ण
१५. अन्नू राणी – अॅथलेटिक्स – महिला भालाफेक – सुवर्ण
१६. टीम इंडिया (ज्योती सुरेखा वेण्णम, ओजस प्रवीण देवताळे) – धनुर्विद्या – मिश्र संघ कंपाऊंड – सुवर्ण
१७. नीरज चोप्रा – अॅथलेटिक्स – पुरुष भालाफेक – सुवर्ण
१८. टीम इंडिया – अॅथलेटिक्स – पुरुष चार बाय चारशे मीटर रिले – सुवर्ण
१९. टीम इंडिया (ज्योती सुरेखा वेण्णम, अदिती स्वामी, परनीत कौर) – धनुर्विद्या – महिला कंपाऊंड संघ – सुवर्ण
२०. टीम इंडिया (दीपिका पल्लीकल, हरिंदर पाल सिंग) – स्क्वॉश – मिश्र दुहेरी – सुवर्ण
२१. टीम इंडिया (अभिषेक वर्मा, ओजस प्रवीण देवतळे, प्रथमेश जावकर) – धनुर्विद्या – पुरुष कंपाउंड संघ – सुवर्ण
२२. टीम इंडिया (पीआर श्रीजेश, क्रिशन पाठक, वरुण कुमार, अमित रोहिदास, जर्मनप्रीत सिंग, हरमनप्रीत सिंग, संजय, सुमित, नीलकांत शर्मा, हार्दिक सिंग, मनप्रीत सिंग, विवेक सागर प्रसाद, शमशेर सिंग, अभिषेक, गुरजंत सिंग, मनदीप सिंग, सुखजीत सिंग, ललित सिंग. कुमार उपाध्याय) – हॉकी – पुरुष – सुवर्ण
२३. ज्योती सुरेखा वेण्णम – धनुर्विद्या – महिला कंपाऊंड वैयक्तिक – सुवर्ण
२४. ओजस प्रविण देवतळे – धनुर्विद्या – पुरुषांचे संयुग वैयक्तिक – सुवर्ण
२५. टीम इंडिया (अक्षीमा, ज्योती, पूजा, पूजा, प्रियांका, पुष्पा, साक्षी कुमारी, रितू नेगी, निधी शर्मा, सुषमा शर्मा, स्नेहल प्रदीप शिंदे, सोनाली विष्णू शिंगट) – कबड्डी – महिला कबड्डी – सुवर्ण
२६. टीम इंडिया (सात्विक साईराज रंकीरेड्डी, चिराग शेट्टी) – बॅडमिंटन – पुरुष दुहेरी बॅडमिंटन – सुवर्ण
२७. टीम इंडिया (ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, राहुल त्रिपाठी, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंग, आकाश दीप) – क्रिकेट – पुरुष क्रिकेट – सुवर्ण
२८. टीम इंडिया (नितेश कुमार, परवेश भैंसवाल, सचिन, सुरजीत सिंग, विशाल भारद्वाज, अर्जुन देशवाल, अस्लम इनामदार, नवीन कुमार, पवन सेहरावत, सुनील कुमार, नितीन रावल, आकाश शिंदे) – कबड्डी – पुरुष कबड्डी – सुवर्ण
१. टीम इंडिया (आशी चौकसे, मेहुली घोष, रमिता जिंदाल) – नेमबाजी – महिला दहा मीटर एअर रायफल संघ – रौप्य
२. टीम इंडिया (अर्जुन लाल जाट, अरविंद सिंग) – नौकानयन – पुरुषांचे हलके दुहेरी स्कल्स – रौप्य
३. टीम इंडिया (नीरज, नरेश कलवानिया, नीतेश कुमार, चरणजीत सिंग, जसविंदर सिंग, भीम सिंग, पुनित कुमार, आशिष, डीयू पांडे) – नौकानयन – पुरुष आठ – रौप्य
४. नेहा ठाकूर – नौकानयन – मुलीची डिंघी – ILCA4 – रौप्य
५. टीम इंडिया (आशी चौकसे, मानिनी कौशिक, सिफ्ट कौर समरा) – नेमबाजी – महिला ५० मीटर रायफल ३ पोझिशन्स संघ – रौप्य
६. ईशा सिंग – नेमबाजी – महिला २५ मीटर पिस्तूल – रौप्य
७. अनंतजीत सिंग नारुका – नेमबाजी – पुरुषांची स्कीट – रौप्य
८. नौरेम रोशिबिना देवी – वुशू – महिला साठ किलो सांडा – रौप्य
९. टीम इंडिया (ईशा सिंग, दिव्या टीएस, पलक गुलिया) – नेमबाजी – महिला 10 मीटर एअर पिस्तूल संघ – रौप्य
१०. टीम इंडिया (साकेथ मायनेनी आणि रामकुमार रामनाथन) – टेनिस – पुरुष दुहेरी – रौप्य
११. ईशा सिंग – नेमबाजी – महिला १० मीटर एअर पिस्तूल – रौप्य
१२. ऐश्वर्य प्रतापसिंग तोमर – नेमबाजी – पुरुषांची 50 मीटर रायफल ३ पोझिशन्स – रौप्य
१३. टीम इंडिया (सरबज्योत सिंग, दिव्या टी.एस) – नेमबाजी – दहा मीटर एअर पिस्तूल मिश्र संघ – रौप्य
१४. कार्तिक कुमार – अॅथलेटिक्स – पुरुष, दहा हजार मीटर – रौप्य
१५. अदिती अशोक – गोल्फ – महिला – रौप्य
१६. टीम इंडिया (मनीषा कीर, प्रीती रजक, राजेश्वरी कुमारी) – नेमबाजी – महिला संघ, ट्रॅप – रौप्य
१७. हरमिलन बैन्स – अॅथलेटिक्स – महिलांची १५०० मीटर – रौप्य
१८. अजय कुमार सरोज – अॅथलेटिक्स – पुरुषांची १५०० मीटर – रौप्य
१९. मुरली श्रीशंकर – अॅथलेटिक्स – पुरुषांची लांब उडी – रौप्य
२०. ज्योती येराजी – अॅथलेटिक्स – महिलांची शंभर मीटर अडथळे – रौप्य
२१. टीम इंडिया (किदाम्बी श्रीकांत, लक्ष्य सेन, चिराग शेट्टी, सात्विकसाईराज रंकीरेड्डी, एमआर अर्जुन, ध्रुवा कपिला, एचएस प्रणॉय, मिथुन मंजुनाथ, साई प्रतीक, रोहन कपूर) – बॅडमिंटन – पुरुष संघ – रौप्य
२२. पारुल चौधरी – अॅथलेटिक्स – महिलांची ३ हजार मीटर स्टीपलचेस – रौप्य
२३. अँसी सोजन – अॅथलेटिक्स – महिलांची लांब उडी – रौप्य
२४. टीम इंडिया (मुहम्मद अजमल, विठ्य रामराज, राजेश रमेश, सुभा व्यंकटेशन) – अॅथलेटिक्स – मिश्र चार बाय चारशे मीटर रिले – रौप्य
२५. मोहम्मद अफसल – अॅथलेटिक्स – पुरुषांची ८०० मी – रौप्य
२६. तेजस्वीन शंकर – अॅथलेटिक्स – पुरुषांचे डेकॅथलॉन – रौप्य
२७. लवलिना बोर्गोहेन – बॉक्सिंग – महिला बॉक्सिंग, ७५ किलो – रौप्य
२८. हरमिलन बेन्स – अॅथलेटिक्स – महिलांची ८०० मी – रौप्य
२९. अविनाश साबळे – अॅथलेटिक्स – पुरुषांची पाच हजार मीटर – रौप्य
३०. टीम इंडिया – अॅथलेटिक्स – महिलांची चार बाय चारशे मीटर रिले – रौप्य
३१. किशोर कुमार जेना – अॅथलेटिक्स – पुरुष भालाफेक – रौप्य
३२. सौरव घोसाळ – स्क्वॉश – पुरुष एकेरी – रौप्य
३३. टीम इंडिया (अतनु दास, धीरज बोम्मादेवरा, तुषार प्रभाकर) – धनुर्विद्या – पुरुष संघ – रौप्य
३४. टीम इंडिया (राजू तोलानी, अजय प्रभाकर खरे, राजेश्वर तिवारी, सुमित मुखर्जी, जग्गी शिवदासानी, संदीप ठकराल) – ब्रिज – पुरुष संघ – रौप्य
३५. अभिषेक वर्मा – धनुर्विद्या – पुरुषांचे संयुग वैयक्तिक – रौप्य
३६. दीपक पुनिया – कुस्ती – पुरुष कुस्ती, ८६ किलो – रौप्य
३७. टीम इंडिया (गुकेश डी, विदित गुजराथी, अर्जुन इरिगाईसी, पेंटाला हरिकृष्णा, रमेशबाबू प्रज्ञनंदा) – बुद्धिबळ – पुरुष संघ – रौप्य
३८. टीम इंडिया (कोनेरू हंपी, हरिका द्रोणवल्ली, वैशाली रमेशबाबू, वंतिका अग्रवाल, सविता श्री बी.) – बुद्धिबळ – महिला संघ – रौप्य
१. टीम इंडिया (बाबू लाल यादव, लेख राम) – नौकानयन – पुरुषांची जोडी – कांस्य
२. रमिता जिंदाल – नेमबाजी – महिलांची १० मीटर एअर रायफल – कांस्य
३. टीम इंडिया (जसविंदर सिंग, भीम सिंग, पुनित कुमार, आशिष) – नौकानयन – पुरुष चार – कांस्य
४. टीम इंडिया (परमिंदर सिंग, सतनाम सिंग, जाकर खान, सुखमीत सिंग) – नौकानयन – पुरुष चार – कांस्य
५. ऐश्वरी प्रताप सिंग तोमर – नेमबाजी – पुरुषांची १० मीटर एअर रायफल – कांस्य
६. टीम इंडिया (विजयवीर सिद्धू, आदर्श सिंग, अनिश भानवाला) – नेमबाजी – पुरुष २५ मीटर रॅपिड फाइल पिस्तूल संघ – कांस्य
७. इबाद अली – नौकानयन – पुरुष विंडसर्फर – RS:X – कांस्य
८. आशी चौकसे – नेमबाजी – महिलांची ५० मीटर रायफल ३ पोझिशन्स – कांस्य
९. टीम इंडिया (अनंतजीत सिंग नारुका, गुर्जोत सिंग खंगुरा, अंगद वीर सिंग बाजवा) – नेमबाजी – पुरुषांची स्कीट टीम – कांस्य
१०. विष्णू सरवणन – नौकानयन – पुरुषांची डिंगी ICLA7 – कांस्य
११. अनुष अग्रवाल – घोडेस्वार – ड्रेसेज वैयक्तिक – कांस्य
१२. टीम इंडिया (जोश्ना चिनप्पा, अनाहत सिंग, तन्वी खन्ना, दीपिका पल्लीकल) – स्क्वॅश – महिला संघ – कांस्य
१३. किरण बलियान – अॅथलेटिक्स – महिला शॉट पुट – कांस्य
१४. गुलवीर सिंग – अॅथलेटिक्स – पुरुष, दहा हजार मीटर – कांस्य
१५. कायनन चेनई – नेमबाजी – पुरुष, ट्रॅप – कांस्य
१६. निखत जरीन – बॉक्सिंग – महिलांचे ५० किलो – कांस्य
१७. जिन्सन जॉन्सन – अॅथलेटिक्स – पुरुषांची १५०० मीटर – कांस्य
१८. नंदिनी आगासरा – अॅथलेटिक्स – पुरुषांची हेप्टाथलॉन – कांस्य
१९. सीमा पुनिया – अॅथलेटिक्स – महिला डिस्कस थ्रो – कांस्य
२०. टीम इंडिया (कार्तिक जगदीश्वरन, हीरल साधू, आरती कस्तुरी राज) – रोलर स्केटिंग – महिला स्पीड स्केटिंग ३ हजार मीटर रिले – कांस्य
२१. टीम इंडिया (विक्रम राजेंद्र इंगळे, सिद्धांत राहुल कांबळे, आनंदकुमार वेलकुमार) – रोलर स्केटिंग – पुरुष स्पीड स्केटिंग ३ हजार मीटर रिले – कांस्य
२२. टीम इंडिया (अहिका मुखर्जी, सुतीर्थ मुखर्जी) – टेबल टेनिस – महिला दुहेरी – कांस्य
२३. प्रिती लांबा – अॅथलेटिक्स – महिलांची ३ हजार मीटर स्टीपलचेस – कांस्य
२४. टीम इंडिया (अर्जुन सिंग, सुनील सिंग सलाम) – अॅथलेटिक्स – पुरुष कॅनो दुहेरी एक हजार मीटर – कांस्य
२५. प्रीती – बॉक्सिंग, महिला ५४ किलो – कांस्य
२६. विठया रामराज – अॅथलेटिक्स – महिलांची ४०० मीटर अडथळे – कांस्य
२७. प्रवीण चित्रवेल – अॅथलेटिक्स – पुरुषांची तिहेरी उडी – कांस्य
२८. नरेंद्र बेरवाल – बॉक्सिंग – पुरुष, ९२ किलो – कांस्य
२९. टीम इंडिया – अॅथलेटिक्स – मिश्र संघ शर्यत चालणे – कांस्य
३०. टीम इंडिया (अनाहत सिंग, अभय सिंग) – स्क्वॅश – मिश्र संघ – कांस्य
३१. परवीन हुडा – बॉक्सिंग – महिला ५७ कि – कांस्य
३२. सुनील कुमार – कुस्ती – ग्रीको-रोमन ८७ किलो – कांस्य
३३. अंतिम पांघल – कुस्ती – महिला ५३ किलो – कांस्य
३४. टीम इंडिया (अंकिता भकट, भजन कौर, सिमरनजीत कौर) – धनुर्विद्या – महिला रिकर्व्ह संघ – कांस्य
३५. एच. एस. प्रणॉय – बॅडमिंटन – पुरुष एकेरी – कांस्य
३६. टीम इंडिया (खुशबू, माईपाक देवी आयकम, लीरेंटोनबी देवी एलंगबम, प्रिया देवी एलंगबम, चाओबा देवी ओइनम) – सेपक्तक्राव – महिला रेग्युलर – कांस्य
३७. सोनम मलिक – कुस्ती – महिला ६२ किलो – कांस्य
३८. किरण बिश्नोई – कुस्ती – महिला ७६ किलो – कांस्य
३९. अमन सेहरावत – कुस्ती – पुरुषांची फ्री स्टाईल ५७ किलो – कांस्य
४०. अदिती स्वामी – धनुर्विद्या – महिला कंपाऊंड वैयक्तिक – कांस्य
४१. टीम इंडिया (सविता पुनिया, बिचू देवी खरीबम, दीपिका, लालरेमसियामी, मोनिका, नवनीत कौर, नेहा, निशा, सोनिका, उदिता, इशिका चौधरी, दीप ग्रेस एक्का, वंदना कटारिया, संगिता कुमारी, वैष्णवी विठ्ठल फाळके, निक्की प्रधान, सुशीला तेनू, सलीमा तेनू) – हॉकी – महिला हॉकी – कांस्य
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.