Abhijit Deepke : बहिणीनंतर आता आई-वडिलांनीही व्यक्त केली चिंता, अभिजीत दीपकेंच्या जन्मदात्यांशी Exclusive बातचीत; पाहा व्हिडीओ

Abhijit Deepke : बहिणीनंतर आता आई-वडिलांनीही व्यक्त केली चिंता, अभिजीत दीपकेंच्या जन्मदात्यांशी Exclusive बातचीत; पाहा व्हिडीओ

छत्रपती संभाजीनगर : एकीकडे अभिजीत दीपकेंच्या बहीण आणि भावोजींनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे अभिजीसाठी पोलीस संरक्षणाकरता निवेदन सादर केल्यानंतर दुसरीकडे त्याच्या आई वडिलांनीही त्यांच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. नुकतेच अभिजीतने त्याला टायफॉईल झाल्याची माहिती इंस्टा व्हिडीओमार्फत दिली. त्यानंतर त्याच्या तब्येतीची काळजी होत असल्याचे अभिजीतच्या आईने म्हटले आहे. अभिजीतच्या आई वडिलांची भावना जय महाराष्ट्रच्या प्रतिनिधीने जाणून घेतली. यावेळी त्यांनी दिल्ली पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्जचा तीव्र निषेध नोंदवला असून लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य व्हाव्यात, अशी आशा व्यक्त केली आहे. तसेच गेल्या दीड महिन्यांपासून अभिजीत विविध राज्यांमध्ये आंदोलन करत असून त्याने लवकर घरी यावे, असे त्याच्या आईने म्हटले आहे. 

हेही वाचा : Abhijit Deepke : ‘काळजी वाटते, त्याच्या जीवाला धोका आहे, महाराष्ट्र पोलिसांनी सुरक्षा द्यावी’; अभिजीतच्या बहिणीचे राष्ट्रपतींना निवेदन

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version