ऑगस्टा वेस्टलॅंड घोटाळाप्रकरणी ईडीने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात ईडीने घोटाळ्याचा मुख्य आरोपी ख्रिश्चिअन मिशेलने भ्रष्टाचाराच्या व्यवहाराच्या फाईलमध्ये शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिले नावांचा खुलासा केला आहे. यामध्ये मिशेलने AP आणि FAM असं लिहीण्यात आले होते. AP म्हणजे कॉंग्रेस पक्षाचा टॉपच्या नेत्याचे नाव असून तर FAM म्हणजे फॅमिली असा होत असल्याचे त्याने सांगितले आहे. त्याचबरोबर मिशेलने अशा अनेक शॉर्ट फॉर्मच्या अर्थांचा खुलासा केला आहे. या प्रकरणी भाजपाने पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली.
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषद घेतली.
राहुल गांधींवर भाजपाची टीका .
राहुल गांधी माहिती नसतानाही बोलतात.
ऑगस्टा वेस्टलॅंड प्रकरणी ED च्या आरोपपत्रात अनेक खुलासे.
ED च्या आरोपपत्रत AP, FAMचा उल्लेख.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.