हिंगोली,६ मे २०२३ प्रतिनिधी: शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी सोमवारी,६ जून रोजी मराठवाड्यात दाखल होणार आहे. पालखीच्या स्वागतासाठी सेनगाव नगरपंचायतीने जय्यत तयारी देखील सुरु केली आहे. शिवाय,रस्त्यांची डागडुजीही केली आहे. आषाढी एकादशीनिमित्त शेगाव येथून संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे निघाली आहे. रिसोड मार्गे सेनगाव ते नर्सी नामदेव येथून औंढा नागनाथ असा या पालखीचा मराठवाड्यातील प्रवास असणार आहे.
सोमवारी, ६ जून रोजी, दुपारच्या सुमारास हि पालखी मराठवाड्यात दाखल होणार आहे. त्यानंतर सायंकाळी सेनगाव शहरात पालखीचे आगमन होणार. पालखीचा येथे दरवर्षी मुक्काम असतो. त्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने वारकऱ्यांच्या जेवणाची आणि राहण्याची सोय केली जाते. त्याशिवाय तालुकाभरातून येणाऱ्या भाविकांना पालखीच्या दर्शनासाठी व्यवस्था केली जाते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.