‘हा’ गुन्हा केला म्हणून बकऱ्यांना केलं अटक

‘हा’ गुन्हा केला म्हणून बकऱ्यांना केलं अटक

झाडं तेलंगणामधील हजुराबाद शहरात एका सामाजिक संस्थेने लावलेल्या झाडाचा पाला दोन बकऱ्यांनी खाल्यामुळे पोलिसांनी चक्क बकऱ्यांना अटक केली आहे. त्यांच्या मालकाला 1 हजार रुपयांचा दंडही लावण्यात आला आहे.

नक्की प्रकरण काय?

“तेलंगानाकु हरिता हरम” यांच्या अंतर्गत ही झाडे लावण्यात आली होती. संघटनेचे असे म्हणणे आहे की, आम्ही 900 झाडे लावली होती, त्यामधील 250 झाडे तर या दोन बकऱ्यांनी खाऊन टाकली आहे. गेल्या काही दिवसापासून  या बकऱ्या आम्ही लावलेल्या झाडाची पाला खात होत्या. मंगळवारी पुन्हा त्या झाडाचा पाला खायला आल्या असताना त्यांना पकडण्यात आले, अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे.

त्या आरोपावर बकऱ्यांना अटक करण्यात आले असून, बकऱ्यांच्या मालकावर 1 हजार रुपयांचा दंड लावला आहे. त्यानंतर त्या बकऱ्यांना सोडण्यात आले आहे. हुजूराबाद नगरपालिकेच्या अधिकारी माधवी यांच्याकडे सेव्ह द ट्रिज संस्थेचे अनिल आणि विक्रांत हे दोन कर्यकर्ते आले होते. त्यानी या दोन बकऱ्यांनविषयी तक्रार केली आहे. त्यांनी असेही सांगितले की, त्या बकऱ्या आमच्यासाठी आता डोकेदुखी ठरल्या आहेत.

आम्ही स्वतःच्या पैशांनी झाडे लावली होती, शहरातील शाळामध्ये, रुग्णालय आणि पोलिस स्थानकाजवळ मात्र या बकऱ्यांनी थोड्यादिवसातच हे झाडे खाऊन टाकली. त्यानंतर बकऱ्यांच्या मालाकाला पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले. मालाकाकडून दंड घेण्यात आला आणि बकऱ्यांना सोडण्यात आले. पंरतु पोलिसांनी मालकाला बकऱ्यांना घरातच चारा खायला घालायचे आणि त्यांना शहराबाहेर सोडायचे नाही असे देखील सांगितले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version