उज्जैनमधील प्रसिद्ध महाकाल मंदिराच्या परिसरात बांधकामासाठी खोदकाम सुरू आहे. या खोदकामादरम्यान जमिनीखालून काही अनमोल वस्तू समोर आल्याचं समजलं आहे. या खोदकामादरम्यान, काही प्राचीन मूर्ती सापडल्या आहेत. तसेच महाकाल मंदिराच्या जमिनीखाली काही जुन्या भिंतीही दिसून आल्या आहेत. त्यामुळे या खोदामाकात आणखी प्राचीन वस्तू मिळू शकते असं दिसून येतं आहे. असा पुरातत्व विभागाचा अंदाज वर्तवला आहे. या खोदामाकात मिळालेल्या मुर्ती या ११ व्या १२ शतकातील आहे. अशा वस्तू पाहून तज्ज्ञांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. सापडलेले अवशेष हे शुंग वंशाच्या राजवटीतील असावेत, असा पुरातत्व विभागाने सांगितले आहे. या अवशेषांची माहिती सांस्कृतिक मंत्रालयाला देण्यात आली आहे. महाकाल मंदिराचा विस्तार करण्यासाठी मंदिराच्या आवारात खोदकाम सुरू आहे. यादरम्यान येथे एक प्राचीन मूर्ती सापडली. दोन दिवसांनी पुरातत्त्ववेत्यांचे एक पथक मंदिराच्या परिसरात दाखल झाले. या अवशेषांची माहिती सांस्कृतिक मंत्रालयाला देण्यात आली. पुरातत्व विभागाकडून डॉ. रमेश यादव, डॉ. ध्रुवेंद्र सिंह जोधा, सर्वेक्षक योगेश पाल आमि पुरातत्वतज्ज्ञ डॉक्टर रमेश कुमार यांच्या पथकाने मंदिराच्या विविध भागांचा दौरा केला. मंदिराच्या उत्तर आणि दक्षिण भागात नवे अवशेष सापडले आहेत. डॉ. रमेश यादव यांनी सांगितले की, महाकालेश्वर मंदिराच्या खाली ११व्या आणि १२व्या शतकातील मंदिर दबलेले असल्याची शक्यता आङे. आम्ही मंदिराच्या आवारात अनेक अवशेष पाहिले आहेत. त्यामध्ये खांब, मंदिराच्या कळसाचा भाग, नक्षिकाम केलेले दगडी रथ यांचा समावेश आहे. यापैकी अनेक अवशेष हे मंदिराच्या अस्तित्वाचा संकेत देणारे काही भागही सापडले आहेत. मंदिराच्या दक्षिण भागात जमिनीखाली चार मीटर खाली आम्हाला एका भिंतीचे अवशेष सापडले आहे. ते शुंग काळाशी संबंधित असल्याचे दिसत आहे. यापूर्वीही असे अन्य अवशेष मिळाले आहेत. त्यामुळे हे मंदिर शुंगकाळातही अस्तित्वात होते असे दिसून येते. २०२० मध्येही मंदिराच्या परिसरात केलेल्या खोदकामामध्ये काही अवशेष सापडले होते. तर पुरातत्व शास्त्रज्ञ रमेश यादव यांनी सांगितले की, याबाबत लवकरच एक विस्तृत अहवाल तयार करण्यात येईल. हा अहवाल आम्ही संस्कृती मंत्रालयाला सोपवणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.