Gondia News : भाची अचानक तडफडू लागली, मदतीसाठी मामा धावला अन्…, काही क्षणांतच घडला धक्कादायक प्रकार

घरातील कूलरमध्ये पाणी भरताना अचानक विजेचा तीव्र प्रवाह उतरल्याने मामा आणि भाची या दोघांचा जागीच विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
Gondia News : भाची अचानक तडफडू लागली, मदतीसाठी मामा धावला अन्…, काही क्षणांतच घडला धक्कादायक प्रकार

घरातील कूलरमध्ये पाणी भरताना अचानक विजेचा तीव्र प्रवाह उतरल्याने मामा आणि भाची या दोघांचा जागीच विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही खळबळजनक घटना आज तिरोडा तालुक्यातील गुमाधावडा येथे घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात आणि गावावर शोककळा पसरली आहे. भाग्यवान बावणे आणि त्यांची भाची सुप्रिया सुरेश सोनटक्के हे दोघे दुपारी घरातील विजेच्या कूलरमध्ये पाणी भरण्याचे काम करत होते.

हेही वाचा- Ketan Agrawal Case: आधी हात-पाय मोडायचे, नंतर…, सिया-चेतनच्या प्लॅनमध्ये त्यांच्याही वरचढ निघाला रितेश; चॅट डिलीट केली पण, एका चुकीने बिंग फुटलं

अचानक कूलरच्या लोखंडी बॉडीमध्ये हाय व्होल्टेज करंट उतरला. पाण्यामुळे विजेचा प्रवाह वेगाने पसरला आणि दोघांनाही विजेचा तीव्र झटका बसला. हा झटका इतका भीषण होता की, मदतीसाठी आरडाओरड करण्याची संधी मिळण्यापूर्वीच दोघांचाही घटनास्थळीच तडफडून अंत झाला.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आहे. ऐन सणासुदीच्या व कौटुंबिक वातावरणात मामा-भाचीचा असा अचानक दुर्दैवी अंत झाल्याने गुमाधावडा गावासह संपूर्ण तिरोडा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version