अमर पाटील, प्रतिनिधी
कोल्हापूर : कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक येथील एसटी वर्कशॉपमध्ये एसटी बस मागे घेताना चाकाखाली सापडून एसटीचा स्वच्छता कर्मचारी पांडुरंग अण्णासो चव्हाण याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी आयूब सिकंदर मणेर याच्या विरोधात शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेठवडगाव येथील पांडुरंग अण्णासो चव्हाण हे एसटी महामंडळाकडे कोल्हापूर आगारात स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करत होते. स्वच्छता कर्मचारी पांडुरंग चव्हाण हे मध्यवर्ती बस स्थानक येथील एसटी वर्कशॉपमध्ये असलेल्या रॅम्पमध्ये स्वच्छतेचे काम करत होते. यावेळी एसटीच्या वर्कशॉप मधील मेकॅनिकल आयुब सिकंदर मनेर हे एसटी बस मागे घेत होते. यावेळी मणेर यांना वर्कशॉपमधील रॅम्पमध्ये स्वच्छता करत असलेले पांडुरंग चव्हाण हे स्वच्छता कर्मचारी दिसले नसल्याने एसटी बसच्या चाकाखाली सापडून गंभीर जखमी झाले. एसटीच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ जखमी पांडुरंग चव्हाण यांना उपचारासाठी सीपीआर येथे दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आयुब मनेर यांच्या विरोधात शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून शाहूपुरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा : Vijay Chaudhari: 'ती' ऑडिओ क्लिप भोवली; भाजप नेते विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.