Nanded Crime : नांदेडमध्ये माणुसकीला काळिमा! नात्याने ‘बाबा’ म्हणायची, त्या नराधमानेच दोन वर्षांच्या चिमुकलीवर केला अत्याचार

नांदेड जिल्ह्यात दोन वर्षांच्या चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले.
Nanded Crime : नांदेडमध्ये माणुसकीला काळिमा! नात्याने ‘बाबा’ म्हणायची, त्या नराधमानेच दोन वर्षांच्या चिमुकलीवर केला अत्याचार

नांदेड जिल्ह्यात दोन वर्षांच्या चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

हेही वाचा- Baramati News : रोहित पवारांच्या PA ची अल्पवयीन मुलगी, नको ते करून बसली; बारामती पोलिसांनी सांगितलं, 3 मिनिटांत नेमकं काय घडलं?

गावातीलच एका व्यक्तीने चॉकलेटचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार केला आणि त्यानंतर तो फरार झाला होता. साधारण 20 ते 25 मिनिटांनंतर तो मुलीला पुन्हा घरी सोडून निघून गेला. मुलगी रडत असल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले. त्यामुळे, आईने विचारपूस केली असता, संबंधित व्यक्तीने तिच्यासोबत गैरकृत्य केल्याचे तिने सांगितले.

चिमुकली नात्याने त्या आरोपीला ‘बाबा’ अशी हाक मारायची. पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपीचा शोध सुरू केला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपीला अटक केली आहे. आरोपीवर पोस्को आणि इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या चिमुकलीवर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांनी दिली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version