Crime News : क्रूरतेचा कळस! वृद्ध दाम्पत्याचा धारदार शस्त्राने गळा चिरला, मृतदेहावर टाकली राख अन् पालापाचोळा; आजी-आजोबांचा मृतदेह पाहून नातवाचा थरकाप

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील निगडोली गावात मंगळवारी दुहेरी हत्याकांडाची घटना घडली.
Crime News : क्रूरतेचा कळस! वृद्ध दाम्पत्याचा धारदार शस्त्राने गळा चिरला, मृतदेहावर टाकली राख अन् पालापाचोळा; आजी-आजोबांचा मृतदेह पाहून नातवाचा थरकाप

खालापूर : रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील निगडोली गावात मंगळवारी दुहेरी हत्याकांडाची घटना घडल्याचे परिसरात दहशतीचे वातावरण पाहायला मिळाले. या गावातील वृद्ध जोडप्याचा गळा चिरुन निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, 75 वर्षीय रघुनाथ फराट आणि त्यांच्या 72 वर्षीय पत्नी सुरेखा फराट या दाम्पत्याचे मृतदेह घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले. या दोघांच्याही मृतदेहांवर राख आणि पालापाचोळा टाकण्यात आला होता. रघुनाथ फराट आणि सुरेखा फराट हे दोघेही फोन उचलत नसल्याने त्यांचा नातू निगडोली येतील त्यांच्या घरी पोहोचला. तेव्हा घरात त्याला आपले आजी-आजोबा मृतावस्थेत आढळून आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपास सुरू केला. खालापूर पोलीस आणि फॉरेन्सिक पथक याबाबत सविस्तर तपास करत आहेत. दरम्यान, अज्ञात आरोपींविरोधात खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा : Prajakt Tanpure : मोठी बातमी! राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे करणार भाजपमध्ये प्रवेश, शरद पवार गटाला धक्का; प्रवेशाची तारीखही ठरली

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version