Jalgaon Road Accident : देवदर्शनावरून परतणाऱ्या चिमुकल्याला ट्रकने चिरडले; मृत बालकाचा मृतदेह रस्त्यावर, ट्रकचालकाला ताब्यात द्या, संतप्त जमावाची मागणी

Jalgaon Road Accident : देवदर्शनावरून परतणाऱ्या चिमुकल्याला ट्रकने चिरडले; मृत बालकाचा मृतदेह रस्त्यावर, ट्रकचालकाला ताब्यात द्या, संतप्त जमावाची मागणी

जळगाव : जळगावच्या ममुराबाद रस्त्यावर प्रजापती नगराजवळ भरधाव ट्रकने आठ वर्षीय मुलाला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कावड यात्रेदरम्यान देवीच्या मंदिरात दर्शन घेऊन बाहेर पडताना या चिमुकल्याला ट्रकने धडक दिली. या भीषण अपघातात मुलाचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला. माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अपघातात ट्रक चालकही किरकोळ जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान, संतप्त जमावाने रस्त्यावर मृत बालकाचा मृतदेह ठेवत ट्रक चालकाला तात्काळ घटनास्थळी आणून जमावाच्या ताब्यात देण्याची मागणी केली आहे. पेटलेला ट्रक विझविण्यासही जमावाकडून विरोध केला जात आहे. परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, पोलिसांकडून जमावाची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

हेही वाचा : Bank Strike: सणासुदीच्या काळात बँकिंग सेवा कोलमडणार! बँक संघटनांकडून 'या' तारखेला देशव्यापी संपाची हाक

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version