नाशिक : सिन्नर तालुक्यात पांचाळे सोमठाणे रस्त्यावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. शनिवारी पहाटे 6 वाजता हा अपघात झाल्याचे समजते. या भीषण अपघातात चालकाचा मृत्यू झाला असून इतर 5 ते 6 जण जखमी झाल्याचे समजते. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची माहिती येथील स्थानिकानी दिली. परिणामी, जीप गाडी रस्त्याच्या कडेला पलटली असल्याचे पाहालयाल मिळत आहे. तसेच गाडीचे पार्टही सर्वत्र विखुरल्याचे दिसून येत आहे. याच ठिकाणी याधीही अपघात झाल्याचे स्थानिक सांगतात. त्यामुळे या रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. येथे वळण घेताना दिशादर्शक फलक आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.