Nashik News : दोन दिवसांपासून ताप, उपचार करून पुन्हा आश्रमशाळेत आणलं अन्…; नाशिकमध्ये 8 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत

गेल्या काही दिवसांपासून आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशातच नाशिकमध्ये आश्रम शाळेतील एका आठ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
Nashik News : दोन दिवसांपासून ताप, उपचार करून पुन्हा आश्रमशाळेत आणलं अन्…; नाशिकमध्ये 8 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत

गेल्या काही दिवसांपासून आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशातच नाशिकमध्ये आश्रम शाळेतील एका आठ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. नाशिकच्या कळवण तालुक्यातील विसरवाडी आश्रम शाळेतून हा प्रकार उघडकीस आला असून सृष्टी ओंकार सूर्यवंशी असे मृत झालेल्या आश्रम शाळेतील विद्यार्थिनीचे नाव आहे. 

हेही वाचा- Pune Baramati Crime: बारामतीत पहाटेच्या सुमारास धक्कादायक घटना! 16 वर्षीय विद्यार्थिनीने इमारतीवरून घेतली उडी; अभ्यासाचा ताण की वेगळंच कारण?

नाशिकच्या कळवण तालुक्यातील विसापूर येथील आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या सृष्टी ओंकार सूर्यवंशी या विद्यार्थिनीला आश्रम शाळेतच ताप आल्यानंतर तिला काल उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार करून पुन्हा आश्रम शाळेत आणल्यानंतर मुलीला अचानक उलटी झाली. त्यानंतर पुन्हा ताप आणि उलटी झाल्याने मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता सदर मुलीचा मृत्यू झाल्याचे समोर आले.

समोर आलेल्या माहितीनुसार, सृष्टीला ताप आल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारानंतरही तिची प्रकृती बिघडत गेल्याने सृष्टीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी विद्यार्थिनीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक येथे पाठवण्यात आल्याची माहिती आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच सृष्टीच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे विसरवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version