Nagpur Crime New: नागपूर हादरलं! वाढदिवसाच्या आनंदावर विरजण, केक कापल्यानंतर दोन गटात तुफान राडा; तरुणावर धारदार शस्त्राने वार

Nagpur Crime New: नागपूर हादरलं! वाढदिवसाच्या आनंदावर विरजण, केक कापल्यानंतर दोन गटात तुफान राडा; तरुणावर धारदार शस्त्राने वार

तेजस होमतुरे, प्रतिनिधी 

नागपूर : नागपुरात वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला रक्तरंजित वळण मिळाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुशीनगर परिसरातील एनआयटी गार्डनजवळ जुन्या वादातून झालेल्या हाणामारीत 18 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. राजवीर सोहनकुमार शर्मा असे मृत तरुणाचे नाव आहे. वाढदिवसाचे सेलिब्रेशन सुरू असताना राजवीर आणि काही युवकांमध्ये जुन्या वादातून बाचाबाची झाली. वाद शांत झाल्यानंतर काही वेळाने राजवीर पुन्हा आपल्या मित्रांसह घटनास्थळी आला. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये पुन्हा हाणामारी झाली. यावेळी राज इलमकर, रोहित इलमकर आणि हनी डोंगरे यांनी राजवीरवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा आरोप आहे. मध्यस्थी करण्यासाठी गेलेला त्याचा मित्र नयन सोनबरसेदेखील जखमी झाला. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी राजवीरला मृत घोषित केले. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

हेही वाचा : Kolhapur News : 'लकी भास्कर'स्टाईल घोटाळा! खातेदाराच्या नावाने मॅनेजरने 1 कोटी 10 लाखांचे कर्ज उचलले; तब्बल चार वर्षांनंतर प्रकरण उघडकीस
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version