‘यायला खूप उशीर केलात’

‘यायला खूप उशीर केलात’

मुंबई, ६ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर पहिल्यांदाच गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी अमित शहा यांनी अजितदादांबाबत मोठे विधान केलं. “अजितदादा, बऱ्याच काळानंतर तुम्ही योग्य जागी बसलात, या ठिकाणी येण्यास तुम्ही उशिर केला, असे शहा म्हणाले.

महिनाभरापूर्वी अजित पवार हे शिवसेना-भाजप सरकारमध्ये सहभागी झाले, त्यानंतर अमित शहा यांच्यासोबत अनेकवेळा अजितदादांची भेट झाली, पण सार्वजनिक कार्यक्रमात हे दोन्ही नेते पहिल्यांदात रविवारी एकाच व्यासपीठावर होते.केंद्रीय सहकार संस्था निबंधक कार्यालयाच्या डिजिटल पोर्टलचे उदघाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते चिंचवड येथे झाले. त्यावेळी शहा बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित होते.

‘यायला खूप उशीर केलात’

शहा म्हणाले, “अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आम्ही पहिल्यादांच एका व्यासपीठावर आहोत. मी अजितदादांना सांगू इच्छितो की हीच जागा आपल्यासाठी योग्य होती, पण बसण्यासाठी तुम्ही उशीर केला. दादा मोठ्या कालावधीनंतर तुम्ही योग्य ठिकाणी बसला आहात,”

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version