युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद शुक्रवारी, १३ जानेवारी रोजी शिवसेना भवन ( दादर ) येथे पार पडली. यावेळी, ‘रस्त्याचं काम समजून न घेता मुख्यमंत्र्यांनी टेंडर काढले’, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांवर आदित्य ठाकरेंनी केली आहे. ‘महापौर, लोकप्रतिनिधी नसताना प्रशासनाला टेंडरचा अधिकार कसा ?’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तसंच, ‘राज्य सरकारकडून मुंबई पालिकेची लूट सुरु आहे’, असंही त्यांनी म्हटलं आहे.
‘मुंबईत ४०० किलोमीटरचे रस्ते खोदून ठेवले आणि तीन वर्षातले टेंडर एकाच वर्षात काढले’, असा आरोप आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर केला आहे. ‘घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना रस्त्याची कामं कशी होतात हे माहित नाही’, असे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केले आहे.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.