जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर
महाराष्ट्रात प्रसिदध असलेली अकलूजची लावणी बंद होण्याच्या मार्गावर आहे. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या पंचाहत्तराव्या जयंती निमित्त. अकलूजचा लावणी महोत्सव सुरू झाला होता..
या स्पर्धेनं यंदा पंचवीस वर्षे पूर्ण केलीत. लोकप्रियतेची आणि प्रसिध्दिची उंची स्पर्धेने गाठल्यामुळे ही स्पर्धा बंद करण्याचा निर्णय संयोजक जयसिंह मोहिते पाटील यांनी घेतलाय.
गेल्या पंचविस वर्षात महोत्सवानं लावणी लोककलावंताना मानसन्मान आणि प्रतिष्ठा मिळवून दिलीये. आता मात्र हा महोत्सव बंद होणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.