जय महाराष्ट्र न्यूज, बारामती
शरद पवार हेच आमचं दैवत आहे, ते सांगतील तीच पुर्वदिशा असते असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी स्पष्ट केले.
बारामतीमध्ये आयोजीत अनंतराव सामाजिक पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी ते बोलत होते.
पद्मश्री प्रकाश आमटे, मंदाकिनी आमटे, योगेश भांगे, जयप्रदा भांगे, दीक्षा दिंडे आणि शांताबाई यादव यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले.
इंदापूरमध्ये शरयू फाऊंडेशनकडून विविध सामाजिक कार्य केली जातात. अजित पवार यांची भावजय शर्मिला पवार या सर्व काम पाहतात.
पण या कामाच्या जोरावर त्या आमदारकी मागणार नाहीत असं म्हणत अजित पवारांनी चिमटाही काढला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.