…तर भाजपचा पराभव निश्चित असं म्हणत अजित पवारांनी दाखवला राहुल गांधींवर विश्वास

…तर भाजपचा पराभव निश्चित असं म्हणत अजित पवारांनी दाखवला राहुल गांधींवर विश्वास

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

सर्व विरोधक एकत्र आले तर भाजपचा पराभव निश्चित असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवला आहे. गुजरात निवडणुकीच्या निकालाबाबत अजित पवार प्रतिक्रिया देताना बोलत होते.

काय म्हणाले अजित पवार

– भाजप सोडून देशातील सर्व राजकीय पक्षांचा evm मशीनवर विश्वास नाही

– मतपत्रिका द्वारे मतदान घेतल्यास कुणाच्याही मनात शंका उरणार नाही

– गुजरातचा निकाल सत्ताधारी भाजपला विचार करायला लावणारा

– गुजरातचा विकास केला असेल तर प्रधानमंत्री याना एवढ्या सभा का घ्याव्या लागल्या?

– केंद्रीय मंत्रिमंडळ, अनेक भाजप शासित राज्याचे मुख्यमंत्री गुजरात मध्ये ठाण मांडून होते

– यावेळी गुजरात मध्ये सत्तापरिवर्तन होणार अशी स्थिती होती

– भाजपच्या पायाखालची वाळू घसरल्याने पाटीदार आंदोलन दडपले गेले, हार्दिकच्या सी डी काढण्यात आल्या

– डॉ. मनमोहनसिंह यांच्यावर मोदींनी केलेले आरोप 1 एकाही भारतीयाला मान्य नाहीत.

– एक राज्य जिंकण्यासाठी शत्रूराष्ट्र असलेल्या पाकिस्तानचा संदर्भ जोडला

– गुजरात निवडणूक जिंकण्यासाठी पंतप्रधान पदावरील व्यक्ती पहिल्यांदाच एवढ्या खालच्या थराला घसरली

– भाजप काठावर जिंकली असली तर खऱ्या अर्थाने काँग्रेस आणि राहुल गांधी जिंकले आहेत

– गुजरात निवडणूकने राहुल गांधीचे प्रगल्भ नेतृत्व समोर आले

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version