अजित पवारांच्या अडचणीत वाढ; SIT करणार चौकशी

अजित पवारांच्या अडचणीत वाढ; SIT करणार चौकशी

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

सिंचन घोटाळाप्रकरणी अजित पवारांच्या अडचणी वाढल्या आहेत. माजी आमदार संदीप बाजोरिया आणि अजित पवारांच्या सहभागासंदर्भात आता SIT चौकशी करणार आहे. नागपूर खंडपीठाकडून यासंदर्भात आदेश देण्यात आले आहेत.

सिंचन घोटाळ्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काही दिवसांपूर्वी चौकशी केली होती.

तसेच, अजित पवारांची यामध्ये भूमिका काय आहेत, हे तपासण्यासाठी लाचलुचपत विभागाकडून ईडीनं कागदपत्रं मागवली होती. याबाबत आता SIT चौकशी करणार असल्याचे आदेश नागपूर खंडपीठाने दिले आहेत.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version