नवी मुंबई : लवकरच ऐरोली ते बेलापूरदरम्यान सर्व स्थानकांचा कायापालट होण्याची शक्यता आहे. स्थानकांचा कायापालट व्हावा, यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्निनी वैष्णव यांची भेट घेतली. रेल्वे स्टेशनची विकामकामे तातडीने मार्गी लावावीत. प्रवाशांना मूलमूत सुविधा मिळाव्यात, या मागण्या खासदार म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे केल्या. यानंतर केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना ही विकासकामे तातडीने करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ऐरोली ते बेलापूर दरम्यान असलेली दहा स्थानके हायटेक होण्याची शक्यता आहे.
खासदार म्हस्के यांनी नवी मुंबईतील प्रवाशांची गंभीर दखल घेत असून बेलापूर ते ऐरोली ही सर्व स्थानके मध्य रेल्वेकडे हस्तांतरित झाली आहेत. यात ऐरोली, रबाळे, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे, सानपाडा, जुईनगर, नेरुळ, सीवूड्स-दरावे आणि बेलापूर या स्थानकांचा समावेश आहे. या स्थानकांची देखभाल आणि दुरुस्ती, मूलभूत सुविधा आता मध्य रेल्वे प्रशासन देणार असल्याची बाब खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या निर्दशनास आणून दिल्याचे समजते.
या समस्या प्रखर्षाने दिसून येतात –
ऐरोली आणि रबाळे येथे तिकीट खिडक्या बंद आहेत.
स्टेशनवरील शौचालये जीर्ण अवस्थेत आहेत.
पायऱ्या आणि फरश्या तुटल्याचे दिसत आहे.
घणसोली आणि कोपरखैराणे येथे प्रचंड वर्दळ असते.
त्यानंतरही तिकीट काउंटर अस्वच्छ असतात.
सर्वत्र धूळ साचलेली पाहायला मिळते.
तुर्भे आणि सानपाडा स्थानकांत शौचालयांमध्ये तीव्र दुर्गंधी, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची कमतरता पाहायला मिळते.
शौचालयात लाईट नाही.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.