Dattatray Bharne : धक्कादायक! कर्जमाफी योजनेतून 94 हजार शेतकऱ्यांना वगळले, तर 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांना कर्जाचं वितरण; कृषीमंत्र्यांची माहिती

Dattatray Bharne : धक्कादायक! कर्जमाफी योजनेतून 94 हजार शेतकऱ्यांना वगळले, तर 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांना कर्जाचं वितरण; कृषीमंत्र्यांची माहिती

मुंबई : कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 36 हजार कोटींची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली असून या योजनेत ज्या शेतकऱ्यांचे 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीककर्ज थकीत आहे, त्यांना दोन लाखाच्या मयदित कर्जमाफी दिली जाणार आहे. या योजनेतील लाभार्थ्यांची पहिली यादी जाहीर झाली असून या योजनेतून सरकारने तब्बल 94 हजार शेतकऱ्यांना वगळ्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच राज्यभरातील 6 लाख 22 हजार 207 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 5 हजार 29 कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली. कर्जमाफी योजनेसाठी लाभार्थ्यांच्या आधार प्रमाणीकरणाचे कामही वेगात सुरू आहे. या महिनाभरात 80 टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. या कर्जमाफीच्या योजनेची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यात 17 लाख शेतकरी पात्र ठरल्याची माहिती राज्य कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

हेही वाचा : PM Kisan Installment: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ कारणांमुळे पीएम किसानचा पुढील हप्ता खात्यात जमा होण्यास येऊ शकतात अडचणी

दरम्यान, योजनेतून वगळण्यात आलेल्या शेतकऱ्यांचा तपशील देताना मंत्री भरणे म्हणाले की, राज्यातील 13 लाख शेतकऱ्यांचे केवायसी पूर्ण झाले आहे. लवकरच सर्व पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळेल. तसेच कर्जमाफी निकष बदलले नाही, महात्मा फुले कर्ज माफीत ज्यांनी लाभ घेतलायं त्यांना देखील लाभ मिळेल. दरम्यान आयकर भरणाऱ्या 94 हजार शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आलं आहे. तर 46 हजार शेतकऱ्यांना इतर कारणांमुळे अपात्र ठरवण्यात आलं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version