Chhatrapati Sambhajinagar : मृत्यूनंतरही दुरावा कायम! वडिलांवर गावी, तर आई-मुलावर माहेरी अंत्यसंस्कार; कुटुंबाला असा निर्णय का घ्यावा लागला?

वाळूज परिसरातील खवड्या डोंगरावरून उडी घेऊन एकाच कुटुंबातील तिघांनी केलेल्या सामूहिक आत्महत्येच्या घटनेनंतर चांदगुडे कुटुंबातील दुरावा मृत्यूनंतरही कायम राहिल्याचे काळीज पिळवटून टाकणारे चित्र समोर आले.
Chhatrapati Sambhajinagar : मृत्यूनंतरही दुरावा कायम! वडिलांवर गावी, तर आई-मुलावर माहेरी अंत्यसंस्कार; कुटुंबाला असा निर्णय का घ्यावा लागला?

छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज परिसरातील खवड्या डोंगरावरून उडी घेऊन एकाच कुटुंबातील तिघांनी केलेल्या सामूहिक आत्महत्येच्या घटनेला आता एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर वळण मिळाले आहे. वाळूज परिसरातील खवड्या डोंगरावरून उडी घेऊन एकाच कुटुंबातील तिघांनी केलेल्या सामूहिक आत्महत्येच्या घटनेनंतर, आता या प्रकरणी नवी अपडेट समोर आली आहे. चांदगुडे कुटुंबातील दुरावा मृत्यूनंतरही कायम राहिल्याचे काळीज पिळवटून टाकणारे चित्र समोर आले आहे. एकाच कुटुंबातील असूनही तिघांचे अंत्यसंस्कार एकत्र केले गेले नाहीत.

मृत मुलगा कुणाल आणि आई संगीता यांच्यावर शहरातील मुकुंदवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले, तर वडील मुरलीधर यांच्यावर त्यांच्या मूळ गावी धनगरपिंपळगाव परिसरातील शिवलाल वस्ती येथील शेतात शुक्रवारी रात्री बारा ते साडेबारा या वेळेत मुरलीधर यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. विशेष म्हणजे या दुःखद घटनेची माहिती त्यांच्या आई-वडिलांना रात्री अंत्यसंस्कार होईपर्यंत नातेवाईकांनी कळू दिली नव्हती. नातेवाईकांनी मुरलीधर यांचा मृतदेह त्यांच्या मूळ गावी नेला, तर संगीता आणि कुणाल यांचे मृतदेह आईच्या गावी मुकुंदवाडी येथे नेऊन तिथे अंत्यसंस्कार केले. यामुळे आता तिघांचे अंत्यसंस्कार एकत्र का केले गेले नाहीत, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

कुणालच्या वडिलांनी मूरलीधर यांनी स्वत:च्या संगीतासोबत मर्जीने लग्न केले होते. यावेळी त्यांच्या आई वडिलांना देखील माहिती दिली नव्हती. त्यामुळे संगीता फारशी त्यांच्या कुटुंबात कोणाला आवडत नव्हती. त्यानंतर मूरलीधर यांनी तीन एकर जमिनीव्यतिरिक्त काही जमीनीचा मोजकाच हिस्सा बहिणींना दिला होता. त्यामुळे कुणालच्या कुणालच्या आई-वडिलांमध्ये सतत वाद होत होते. या सगळ्यामुळे कुणालदेखील नैराश्यामध्ये गेला होता.
हेही वाचा- Chhatrapati Sambhajinagar : खवड्या डोंगर प्रकरणाला चक्रावून टाकणारा अँगल! आदल्या रात्री आईची भावनिक पोस्ट, सोशल मीडियावर खळबळ
आदल्या रात्री आईची भावनिक पोस्ट
​यापूर्वी मोबाईलच्या हप्त्यावरून मुलाने राग धरल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र, मृत मुलगा कुणालची आई संगीता चांदगुडे यांचे आत्महत्येपूर्वीचे काही व्हिडिओ समोर आले असून, या व्हिडीओंमध्ये त्यांनी पतीच्या नातेवाइकांमुळे आपला संसार उद्ध्वस्त झाल्याचा, सतत कौटुंबिक छळ सोसावा लागल्याचा आणि हक्काची संपत्ती लाटल्याचा थेट आरोप केला आहे. ​समोर आलेल्या व्हिडिओमध्ये संगीता चांदगुडे अत्यंत उद्विग्न मनस्थितीत बोलताना दिसत आहेत.

"माझ्या संसाराची राखरांगोळी केलीस, माझ्या मुलाला त्याच्या वडिलांपासून दूर केलेस, तू 7 पिढ्या हे पाप फेडशील, हा एका आईचा शब्द आहे." अशा शब्दांत त्यांनी नणंद व नातेवाइकांवर कौटुंबिक छळ आणि संपत्ती हडपल्याचा थेट आरोप केला आहे. संगीता यांचे हे व्हिडिओ समोर आल्यानंतर आत्महत्येमागे कौटुंबिक छळ, संपत्तीचा वाद आणि मानसिक त्रास होत. नव्या व्हिडिओ पुराव्यांच्या आधारे एमआयडीसी वाळूज पोलीस आता संबंधित नातेवाईकांची सखोल चौकशी करण्याची शक्यता आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version