Doctor Death : 22 वर्षीय BAMS डॉक्टरचा झोपेतच संशयास्पद मृत्यू, ओषधांचा ओव्हरडोस की आणखी काय?; पोलीस तपासातून धक्कादायक माहिती समोर

Doctor Death : 22 वर्षीय BAMS डॉक्टरचा झोपेतच संशयास्पद मृत्यू, ओषधांचा ओव्हरडोस की आणखी काय?; पोलीस तपासातून धक्कादायक माहिती समोर

सुरेंद्र अकोडे, प्रतिनिधी 

अमरावती :  नाशिक येथून नुकतीच बीएएमएसची पदवी पूर्ण केलेल्या आदित्य रावटे या 22 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणाचा झोपेतच संशयास्पद मृत्यू झाला आहे. वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे. मृत आदित्यला लहानपणापासूनच फिटचा (अपस्मार) आजार होता. तसेच स्वतःचा रंग गोरा करण्यासाठी तो स्वतःवरच उपचार करत काही औषधे घेत असल्याची माहिती मिळत आहे. यातूनच औषधांचा ओव्हरडोस झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येतं आहे.

नेमकं काय घडलं?

आदित्य त्याच्या खोलीत उलटा झोपलेल्या अवस्थेत आढळला असून त्याच्या डोळ्यांतून रक्त येत होते. प्राथमिक शवविच्छेदनात श्वासावरोध आणि हार्ट अटॅकमुळे हा मृत्यू झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. मात्र, हा मृत्यू गोरे होण्याच्या औषधांच्या ओव्हरडोसमुळे झाला की फिटच्या आजारामुळे?, याचा  उलगडा व्हिसेरा तसेच संपूर्ण शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच होणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रिटा उईके यांनी दिली. 

हेही वाचा : Narendra Pawar : शस्त्राचा धाक दाखवून, दारू पाजून विवाहितेवर शारीरिक अत्याचार, भाजपच्या नरेंद्र पवारांवर गंभीर आरोप; पोलिसांत गुन्हा दाखल

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version