आधार-पॅन जोडणी अनिवार्य, 31 ऑगस्ट अंतिम तारीख

आधार-पॅन जोडणी अनिवार्य, 31 ऑगस्ट अंतिम तारीख

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

केंद्र सरकारने बंधनकारक केलेल्या पॅन-आधार जोडणीसाठी 31 ऑगस्ट अंतिम तारीख असणार आहे. गुरुवारी सुप्रीम कोर्टाने खासगीपणाच्या मुद्द्यासंदर्भातील दिलेल्या निर्णयाचा आधार

आणि पॅन कार्ड जोडणीशी काहीही संबंध नसल्याचे ‘भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणा’चे सीईओ अजय भूषण पांडे यांनी स्पष्ट केले.

 

 

सर्व सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि विविध अनुदाने प्राप्त करण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

करदात्यांना आधार कायदा, प्राप्तिकर कायदा तसेच मनी लाँडरिंगसह सर्वच कायद्यांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

 

 

घरगुती गॅसवरील अनुदानापासून ते बँकेत खाते उघडणे आणि नवा मोबाइल क्रमांक घेणे आदी सर्व सेवांसाठी आधार कार्ड देणे बंधनकारक

करण्यात आले आहे. तर 31 ऑगस्ट आधार-पॅन जोडणीची अंतिम तारीख असणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version