अरमान कोहलीला अटक, गर्लफ्रेंडला केली होती बेदम मारहाण…

अरमान कोहलीला अटक, गर्लफ्रेंडला केली होती बेदम मारहाण…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

बिगबॉस फेम अरमान कोहलीवर गर्लफ्रेंड नीरु रंधावाने गेल्या आठवड्यात बेदम मारहाण केल्याची तक्रार मुंबईतील सांताक्रुझ पोलिसात केली होती. सांताक्रूझमधील आपल्या राहत्या घरी रविवारी दुपारी अरमानने रागाच्या भरात नीरूला मारहाण केली असल्याची तक्रार नीरूने नोंदवली होती.

त्यानंतर अरमान फरार झाला होता. मारहाणीत नीरु रंधावाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. 

तिच्यावर अंधेरीतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. मात्र आता या प्रकरणी अभिनेता अरमान कोहलीला लोणावळ्यात अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी कारवाई करुन अरमानला बेड्या ठोकल्या आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version