जय महाराष्ट्र न्यूज, कराड
झटपट पैसे कमवायच्या हव्यासापोटी कराड तालुक्यातील किशोर पैलवानाला आपला जीव गमवावा लागला आहे. एका महाराजाने आपल्या साथीदारांच्या मदतीने या पैलवानाचा खून आठ महिन्यांपूर्वी केल्याची घटना आता उंब्रज पोलिसांनी उघडकीस आणली आहे. गेले आठ महिने या खूनाचा उलगडा होत नव्हता पण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या 3 दिवसांत या गुन्ह्याची उकल केली आहे.
याप्रकरणात आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी दृश्यम या गाजलेल्या चित्रपटाच्या कथानकाचा आधार घेतल्याची माहिती देखील समोर आली आहे. किशोर रामचंद्र गायकवाड स्कॉर्पिओ गाडीसह बेपत्ता असल्याची फिर्याद 8 महिन्यांपूर्वी उंब्रज पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. मात्र, उंब्रज पोलिसांना या प्रकरणात काही हाती लागत नव्हेत.
अखेर या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आणि अवघ्या 3 दिवसांत या प्रकरणाचा उलगडा करण्यात त्यांना यश आले. मात्र, या प्रकरणात एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे .रेडिएशन पॉवरच्या नावाखाली पैसे डबल करण्यात येतील असे सांगून या आरोपी टोळीने अनेकांना लुबाडलं होतं.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.