कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या अध्यक्षेखाली छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन दिवस सीजेपीची बैठक झाली. आता पुढे कॉकरोच जनता पार्टीचे काय होणार हे नुकताच अभिजीत दिपके यांनी सांगितले. यावेळी देशातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न आणि समस्या जाणून घेण्यासाठी सीजेपीकडून एक विशेष आणि महत्त्वाची मोहिम राबवण्यात येणार आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात 'कॉकरोच जनता पार्टी'च्या वतीने देशभरात 'क्या बोलती पब्लिक' हे व्यापक आंदोलन आणि मोहीम राबवली जाणार आहे. ही घोषणा 'सीजेपी'चे अभिजीत दीपके यांनी केली असून या मोहिमेत त्यांनी जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
यावेळी अभिजीत दिपके यांनी म्हटलं की, "25 जुलै देशातील तरुणांनी कुणालाही जमले नाही ते करून दाखवले. या देशातील जेन झी नी सरकार कडून राजीनामा घेऊन दाखवला …. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा सर्वात मोठा विजय असे म्हटले आहे. मात्र जी भीती देशात होती ती भीती दूर झाली आहे. तरुणाईने देशातील भीती संपवली आहे. CJP नेमकी काय विचारधारा काय, ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, जवाहरलाला नेहरू यांच्या विचारावर चालणारी जनता पार्टी राहणार आहे. आम्ही सेक्युलर आहोत, आम्ही संविधानावर विश्वास ठेवतो. पुढे काय? मागच्या दोन दिवसातील चर्चेत असे ठरले. येत्या सप्टेंबर मध्ये देशव्यापी कॉम्पेन, करून देशभर दौरे करणार याचे नाव क्या बोलती पब्लिक असे नाव राहणार आहे…"
"आपल्या देशातील परिस्थिती, शिक्षेचे स्थर याबाबत आम्ही लोकांशी बोलणार… आज भारतात शिक्षण घेणे म्हणजे डोक्यावर कर्ज घेणे अशी परिस्थिती आहे. गेल्या काही वर्षात देशात शिक्षण म्हणजे व्यवसाय झाला आहे. संस्थेबद्दलचा राग जंतर मंतर दिसून आला. एकाला वोट टाकला जातो मात्र तो दुसऱ्याच पक्षात दिसतो त्यामुळे लोकांचा विश्वास तुटत चालला आहे. न्यायालयावर देखील अनेक प्रश्न आहे.तारीख पे तारीख म्हणले जाते. गरिबाला तारीख मिळत नाही. मात्र मोठ्या लगेच मिळते. सामन्याला न्याय पाहिजे तेंव्हा कोर्टाकडे वेळ नसतो. लोकांचा सगळ्यात जास्त राग मिडिया वर आहे. मिडिया फक्त सत्ताधारी यांचेच आवज एकटे. जो पर्यंत माध्यमे स्वातंत्र्य वागणार नाही तो पर्यंत अकाउंटेबल बनविणे शक्य नाही."
"आपल्या देशात 60 टक्के 35 वर्षाखालील आहेत. आपल्या देशात नोकरीच्या संधी नाहीत. जण नोकरी मिळते त्यांना घर चालवणे शक्य नाही. मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहेत.त्यातील बहुतांश लोकांकडे पदवी आहे. त्यांना आज वाटते पदवी घेऊन आम्ही चुकी केली आहे. युवक, शिक्षण आणि बेरोजगारीचा मुद्दा तुम्ही नजरंदाज करू शकत नाही… एखादा व्यक्ती सर्व समस्या संपवेल असे म्हणत असेल तर तो चुकीचा बोलत आहे. 2014 सारखी चुकी करू नका, म्हटले गेले होते कशीचे टोकियो करू मात्र काशाची काशी केलीय. क्या बोलती पब्लिक हे कॅम्पेन आम्ही सप्टेंबर पासून देशभरामध्ये राबवणार आहोत. या कॉम्पेनसाठी आम्ही देशभर फिरणार आहोत."
हेही वाचा- 'नीट'वर आक्रमक CJP, झारखंडमध्ये मात्र शांत?
पुढे अभिजीत दिपके म्हणाले की, "सकाळी दुसऱ्या पक्षातून एखादा आमदार खासदार निवडून येतो आणि संध्याकाळी दुसऱ्या पक्षात असतो, तसे नाही झाले तर न्यायालयाचे पक्ष संपवला जातो. निवडणूक आयोगावर देखील आम्हाला काम करावं लागणार आहे. यानंतर असे निवडणूक होतील की त्या फक्त नावाला होतील, नाहीतर राजकीय पक्ष घोटाळे करून निवडून येतील…. आणि निवडणुका फक्त नावाला उरतील. बऱ्याच वेळेस न्यायला तारीख मिळाल्याच्या नंतरही आमच्याकडे वेळ नाही म्हणून न्यायाधीश सांगतात. ग्राउंडवर काम करणाऱ्या पत्रकारांना आणि समजू शकतो त्यांची किती मागत आहे…. पण काही मीडिया एजन्सीज आहे की एखाद्या पक्षाचा एजेंडा घेऊन समोर जात आहे…. काही मीडिया हाऊस फक्त एका पक्षाच्या झाल्या आहेत…. हीच परिस्थिती राहिली तर लोक चॅनल पाहणे बंद करेल. मोठमोठ्या ऍडव्हर्टाईस मिळतात त्यावर मीडिया एजन्सी चालतात… पण जनतेनेच पाहणे सोडले तर किती मोठ्या अडवर्टाइजिंग मिळाल्या तर काय फायदा? आमचे आंदोलन दाखवले नाही तरी आम्हाला यश मिळाले."
"आपले महत्वाचे म्हणजे कॉकरोच जनता पार्टीचे स्कॅनर घेऊन आलो आहोत जिथे लोक स्कॅन करून त्यांच्या तक्रारी सांगू शकतात आणि त्यांना आम्ही मदत करू शकतो… आमच्या साइटवर जाऊन देखील लोक आमच्या सोबत संपर्क साधू शकता…. स्कॅनर च्या माध्यमातून आम्ही कॉक्रोच जनता पार्टी वाढवणार आहोत. आमच्या बाबतीत चुकीची माहिती दिल्या जात आहे आम्ही कुणाकडूनही फंडिंग घेत नाही आहोत. आम्हाला कुणाचीही फंडिंग नाही आणि आम्ही ती स्वीकारतही नाही. संघटना म्हणून आम्ही समोर जाणार आहोत."
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.