वृत्तसंस्था, बंगळूर
स्टॅम्प पेपर घोटाळा प्रकरणातील प्रमुख सूत्रधार अब्दुल करीम तेलगीची तब्येत खालावली आहे. सध्या त्याच्यावर बंगळुरुच्या व्हिक्टोरिया रूग्णालयात उपचार सुरू असून त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
बेळगाव जिल्ह्यातील खानापूर स्टेशन रोड येथील रहिवाशी असलेला अब्दुल करीमने केलेल्या कोट्यवधी रुपयांचा बनावट मुद्रांक घोटाळा उघडकीस आल्यानंतर संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली होती. त्याचा भाऊ अजिम तेलगी हा खानापूर नगरपालिकेचा विद्यमान उपनगराध्यक्ष असून, या घोटाळ्याप्रकरणी त्यालाही अटक करण्यात आली होती.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.