आराध्या बच्चनची उच्च न्यायालयात धाव

आराध्या बच्चनची उच्च न्यायालयात धाव

बॉलीवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचे कुटुंब बॉलीवूडच्या काही प्रतिष्ठित कुटुंबांपैकी एक आहे. अलीकडेच एका फेक न्युजमुळे त्यांचं कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अमिताभ बच्चन यांची नात आराध्या बच्चन हिने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतल्याने चर्चांना उधाण आले. युट्युब टॅब्लॉइडने अफवा पसरवल्याने हे प्रकरण पेटले आहे.

युट्युब टॅब्लॉइडने आराध्या बच्चन हिच्या तब्येतीविषयी खोटी बातमी पसरविल्याने ऐश्वर्या राय- बच्चन आणि अभिषेक बच्चन चांगलेच संतापले आहेत. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी युट्युब टॅब्लॉइड विरुद्ध याचिका दाखल केली. यात ते म्हणाले, ‘त्यांची मुलगी अल्पवयीन आहे. तिच्याविरुद्ध अशा नकारात्मक बातम्या अस्वस्थ करणाऱ्या असतात.’
आराध्या बच्चनच्या या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. तर यावर न्यायमूर्ती सी हरिशंकर यांचे एकल न्यायमूर्ती खंडपीठ सुनावणी करणार आहे.

दुसरीकडे अभिषेक बच्चनने आराध्याच्या विरोधात होणाऱ्या ट्रोलिंग आणि नकारात्मक बातम्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या मुलीच्या विरोधात अशा अश्लील गोष्टी अजिबात खपवून घेणार नाही, असे त्याने सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version