जय महाराष्ट्र न्यूज, लातूर
पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र दिनाला महाश्रमदानाचं आवाहन आमिरनं केलं होतं मात्र आज आमिर स्व: ता देखील श्रमदान करत आहे. आमिर खान आणि आलिया भट आज लातूर येथील फत्तेपुर येथे श्रमदान करतायत.
आज सकाळी दोघे लातूर विमानतळावर दाखल झाले. लातूर जिल्ह्यातील 171 गावांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. गाव पाणीदार करण्यासाठी ग्रामस्थांसोबतच सेलिब्रिटीही श्रमदान करून ग्रामस्थांचा उत्साह वाढवत आहेत. या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक हिंदी मराठी सेलिब्रिटी आज श्रमदान करत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.