Washim News : 8 किलो ज्वारी…12 किलो तांदूळ…राशनसाठी तरुणाचं टॉवरवर चढून आंदोलन; बघ्यांची तोबा गर्दी

Washim News : 8 किलो ज्वारी…12 किलो तांदूळ…राशनसाठी तरुणाचं टॉवरवर चढून आंदोलन; बघ्यांची तोबा गर्दी

वाशिम : वाशिमच्या फुलउंबरी येथील स्वस्त धान्य दुकानातून राशन मिळत नसल्याच्या मागणीसाठी तरुणाने टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले. या घटनेने मात्र परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनी मोठी गर्दी केली. दुपारी 3 वाजल्यापासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे गावात खळबळ उडाली. गेल्या 4 तासापासून एक तरुण टॉवरवर चढून आंदोलन करत आहे. कबीरदास दयाळू जाधव असं या तरुणाचं नाव आहे. हा तरुण फुलउंबरीचाच रहिवासी आहे. कबीरदास जाधव यांच्या कुटुंबाला नियमानुसार 8 किलो ज्वारी आणि 12 किलो तांदूळ मिळत असून, 28 ऑगस्ट रोजी त्यांना चालू महिन्याचे धान्य देण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र जाधव हे जुलै महिन्याचे राशन मिळावे, अशी मागणी करत आहेत. दरम्यान, जाधव हे जुलै महिन्यात राशन घेण्यासाठी उपस्थित नसल्याने त्या महिन्याचे धान्य देता येत नसल्याचे स्वस्त धान्य दुकानदाराकडून सांगण्यात आले. राशनच्या मागणीवरून सुरू झालेल्या या आंदोलनामुळे प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. टॉवरवरून युवकाला खाली उतरवण्यासाठी गेल्या तासभरापासून मानोरा पोलीस दाखल झाले असून सध्या त्याची विनवणी सुरू आहे.

हेही वाचा : Accident News : रक्षाबंधनाच्या दिवशीच काळाचा घाला! भावाला राखी बांधण्यापूर्वीच बहिणीचा मृत्यू, चिमुकलीचे शीर धडावेगळे; मद्यधुंद चालकाने उद्ध्वस्थ केले कुटुंब

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version