Bhandara Accident : ड्राईव्हरची एक चूक पडली महागात! चालकाचे नियंत्रण सुटलं अन् 8 जण जीवानिशी गेले

भंडारा जिल्ह्यातून पहाटेच्या सुमारास एक अत्यंत भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगाव सडक येथील भाऊ ढाब्याजवळ ट्रक आणि पिकअप व्हॅनमध्ये जोरदार धडक झाली.
Bhandara Accident : ड्राईव्हरची एक चूक पडली महागात! चालकाचे नियंत्रण सुटलं अन् 8 जण जीवानिशी गेले

भंडारा जिल्ह्यातून पहाटेच्या सुमारास एक अत्यंत भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगाव सडक येथील भाऊ ढाब्याजवळ ट्रक आणि पिकअप व्हॅनमध्ये जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात तब्बल 8 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये तीन लहान बालकांचाही समावेश आहे. 

हेही वाचा- Kalyan: कार्यालयाच्या ताब्यावरून कल्याणमध्ये राडा; हाणामारीत पदाधिकारी गंभीर जखमी, दोघांना किरकोळ दुखापत

तर तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. पहाटेच्या सुमारास नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगाव सडक परिसरात हा भीषण अपघात घडला. भाऊ ढाब्याजवळ ट्रक आणि पिकअप व्हॅनची जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला.

या दुर्घटनेत तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केलं. या अपघातात तीन जण जखमी झाले असून, त्यांना तातडीने साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास पोलीस करत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version