Pune Crime : संतापजनक! चार वर्षीय चिमुकलीला चॉकलेटचं आमिष देत केल अमानुष कृत्य

पुणे रेल्वे स्टेशनवर चार वर्षे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Pune Crime : संतापजनक! चार वर्षीय चिमुकलीला चॉकलेटचं आमिष देत केल अमानुष कृत्य

पुणे रेल्वे स्टेशनवर चार वर्षे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 17 फेब्रुवरीला मध्यरात्री फलाक क्रमांक तीन व दोनवर हा लैंगिक अत्याचार केल्याची माहिती मसोर आली आहे. चार वर्षे अल्पवयीन मुलीची आई, वडील आणि मुलगी प्लॅटफॉर्मवर झोपली असताना फसवून आरोपी मुलीला घेऊन गेला. मुलीला चॉकलेट बिस्कीट खाण्याचे आमिष दाखवून आरोपीकडून लैंगिक अत्याचार करण्यात आला. 5 दिवसानंतर हा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. मुलगी आणि आरोपी दोघेही परप्रांतीय असून लोहमार्ग पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलं आहे. लोहमार्ग पोलीस या संदर्भात अधिक तपास करत असून पोलिसांनी आरोपीला कोर्टात हजर करून अटक केली आहे. मुलीवर अत्याचार झाल्याने महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान नागरिकांकडून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version