धाराशीव : धाराशिवमधून एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या घरात जोरदार राडा झाला आहे. शिवसेना शिंदे गटाचे दोन कार्यकर्ते आपसात भिडले, त्यांच्यामध्ये यावेळी फ्रि स्टाईल हाणामारी झाल्याचं पहायला मिळालं. ओमराजे निंबाळकर यांच्या घरी एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, या बैठकीनंतर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या कार्यकर्त्यांमध्ये काही कारणांवरून वाद झाला, त्यानंतर दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची माहिती समोर येत आहे. अखेर ओमराजे यांचे बंधू डॉ. जय राजे यांच्या मध्यस्थीने हा वाद मिटला. दरम्यान, या दोन कार्यकर्त्यांमध्ये नेमका वाद कोणत्या कारणांवरून झाला हे अजून अस्पष्ट नाही.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.