School Van Accident : चेंबूर दुर्घटनेनंतर आणखी एका स्कूल व्हॅनचा अपघात; 3 ते 4 विद्यार्थ्यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट

मुंबईतील चेंबूर येथे एका खाजगी शाळेच्या बसवर झाड कोसळून दहा वर्षीय शालेय विद्यार्थ्याचा अपघाती मृत्य झाला. ही घटना ताजी असतानाच आता नागपूर शहरात आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली.
School Van Accident : चेंबूर दुर्घटनेनंतर आणखी एका स्कूल व्हॅनचा अपघात; 3 ते 4 विद्यार्थ्यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट

राज्यात अपघातांचे सत्र सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतचं मुंबईतील चेंबूर येथे एका खाजगी शाळेच्या बसवर झाड कोसळून दहा वर्षीय शालेय विद्यार्थ्याचा अपघाती मृत्य झाला. ही घटना ताजी असतानाच आता नागपूर शहरात आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली. नागपूरच्या पंचशील चौकातून एका स्कूल व्हॅनला महापालिकेच्या आपली बससेवेच्या बसने जोरदार धडक दिली आहे. या धडकेत तीन ते चार विद्यार्थी जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा अत्यंत गंभीरपणे ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा- Mumbai Local: झुरळांच्या समस्येवर रेल्वे प्रशासनाची धावपळ; मुंबई लोकलमध्ये राबवण्यात येणार विशेष स्वच्छता मोहीम

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी नागपुरातील पंचशील चौकावर पत्रकार भवनातून कॅनल रोडकडे जाणाऱ्या स्कूल व्हॅनला महापालिकेच्या आपली बससेवेच्या बसने आडवी धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, त्यात आतमध्ये बसलेले विद्यार्थी त्यांच्या सीटवरून खाली कोसळले ज्यामुळे त्यांच्यातील तीन ते चार विद्यार्थी जखमी झाले. तर बसची धडक जोरदार असल्यामुळे स्कूल व्हॅनचा काही भाग चेपला गेला ज्यामुळे स्कूल व्हॅनचे नुकसान झाले आहे. सकाळी सात ते सव्वा सात दरम्यान ही घटना घडल्याची माहिती आहे.

या घटनेत तीन ते चार विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना प्रथमोपचारासाठी जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर इतर विद्यार्थांना सुरक्षितपणे घरी सोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तर हा अपघात नेमका कोणाच्या चुकीमुळे झाला, दोन्ही वाहने नेमकी वेगात होती का या सर्व बाबींचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.  सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सकाळीच झालेल्या अपघाताने नागपूरकरांच्या काळजाचा ठोका चुकवला. तर या अपघातानंतर परिसरात एकच खळबळजनक वातावरण निर्माण झाले होते. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version