सुधारित जाहिरातीत शिंदेंसह फडणवीसांचाही फोटो

सुधारित जाहिरातीत शिंदेंसह फडणवीसांचाही फोटो

“राष्ट्रात मोदी महाराष्ट्रात शिंदे” या जाहिरातीने मंगळवारी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वादंग निर्माण झाला. शिंदे गटाच्या या जाहिरातीमुळे शिंदे-फडणवीस युतीत आलबेल नसल्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या. शिंदे गटाने केलेल्या या जाहिरातीत फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच छायाचित्र असल्यानेही आरोप प्रत्यारोप झाले. राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांना दिलेल्या या जाहिरातीमुळे जनमाणसांत राज्य सरकारविषयी निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याकरता आज शिंदे गटाने डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. आजही त्यांनी राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांना जाहिरात देऊन “राष्ट्रात मोदी महाराष्ट्रात शिंदे” या जाहिरातीला “जनतेच्या चरणी माथा, गर्जा महाराष्ट्र माझा” या जाहिरातीने उत्तरार्ध केला आहे.

या जाहिरातीतील विशेष आकर्षण म्हणजे शिवसेनेच्या नऊही मंत्र्यांचे फोटो खाली छापण्यात आले आहेत. तर, जाहिरातीच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, धर्मवीर आनंद दिघे आणि शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचेही फोटो लावण्यात आले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version