जळगावमधून मोठी दुर्घटना झाल्याची बातमी समोर येत आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील संत सखाराम महाराज वाडी संस्थानाला भीषण आग लागली असून आसपासच्या परिसरात खळबळ उडाली आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील ऐतिहासिक आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तसेच प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत सखाराम महाराज वाडी संस्थानमध्ये आज अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
आग इतकी भीषण आहे की यावेळी वाडी संस्थांनातून आगीचे मोठ-मोठे लोट बाहेर पडताना दिसत होते, त्यामुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण होत प्रचंड खळबळ उडाली. आगीची घटना समोर येताच संस्थानात असलेल्या सेवेकरी व भाविकांना तातडीने बाहेर काढण्याचे काम सुरु करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळतात आग नियंत्रणात आणण्यासाठी अमळनेर नगरपरिषदेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक प्रशासनाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
मात्र, आगीची तीव्रता जास्त असल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यात अडचणी आल्या. ही भीषण आग असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पत्रकार संघाच्या वतीने खाजगी टँकरला देखील आणण्यात आले होते. त्यामुळे आता आग नियंत्रणात आली आहे. सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कंट्रोल पॅनलमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र ही आग नेमकी कशी लागली यासंदर्भातली माहिती अद्याप समोर आलेली नाही.
आग विझवण्यासाठी अमळनेर सह, चोपडा, धरणगाव येथील अग्निशमन दलाचे बांबं पाचारण करण्यात आले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार अमळनेरच्या वाडी संस्थानाला लागलेली भीषण आग तब्बल तासाभरानंतर आटोक्यात आली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसावी, अशी शक्यता वर्तावली जात आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेवले जात असून, मदतकार्य वेगाने सुरू आहे.
या घटनेचा सविस्तर अहवाल लवकरच हाती येण्याची शक्यता आहे. अमळनेर येथील ऐतिहासिक वाडी संस्थान श्री संत सखाराम महाराज समाधी मंदिर परिसरात भीषण आग लागली असून आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक अंदाजानुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे, मात्र याला प्रशासनाकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.