Mumbai Rain Alert : मुसळधार पावसाचा अलर्ट! आज मुंबईतील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; पालिका उद्यानेही राहणार बंद

Mumbai Rain Alert : मुसळधार पावसाचा अलर्ट! आज मुंबईतील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; पालिका उद्यानेही राहणार बंद

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून एक महत्त्वाचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून आज, मंगळवार 7 जुलै 2026 रोजी मुंबई परिसरातील सर्व माध्यमांच्या तसेच सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगराला मंगळवार 7 जुलै 2026 रोजी मुसळधार पावसाचा (Orange Alert) तसेच सोसाट्याचे वारे वाहतील, असा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा आणि महाविद्यालयांना मंगळवारी सुट्टी जाहीर केली आहे. तसेच आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी मुंबई महानगरपालिकेच्या 1916या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच, प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा : Nashik Cloudburst Warning : ढगफुटीसदृश्य पावसासाठी प्रशासन सज्ज; मध्यरात्रीच 100 नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर, पोलीस तैनात, अधिकारी अलर्ट

शिवाय पालिकेची उद्यानेदेखील मंगळवारी बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दोन दिवसांत मुंबईत पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे विविध ठिकाणी झाडे व झाडांच्या फांद्या पडण्याच्या घटना घडल्या आहेत. महानगरपालिका क्षेत्रात एकूण 400 झाडे आणि 600 फांद्या पडल्याची नोंद आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उद्याने बंद ठेवण्यात आली आहेत. कुटुंबीयांच्या सुरक्षिततेसाठी संबंधित दिवशी उद्यानांना भेट देणे टाळावे, तसेच महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. हवामान परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय जाहीर करण्यात येईल, असेही नमूद केले आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version