नाशिक : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर रोडवरील साई किनारा हॉटेलवर रविवारी रात्री टोळक्यांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हॉटेलवर १०-१५ जणांच्या टोळक्यांनी हल्ला केल्याची घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेत हॉटेल मॅनेजर गंभीररित्या जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झाली असून पोलीस घटनेचा तपास करत आहेत. सीसीटीव्ही फुटेजनुसार या टोळ्यांनी लोखंडी रॉड, काठ्यांच्या सहाय्याने हॉटेलची तोडफोड केल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच येथील वस्तूंची नासधूस, खुर्च्या उचलून आपटणे, रस्त्यावरील दगड फेकून मारणे असेही प्रकार त्या टोळक्यांनी केल्याचे दिसत आहे. हा हल्ला नेमका कशासाठी करण्यात आला हे अद्याप समोर आले नाही. मात्र अशाप्रकारे हल्ला करून दहशत माजवल्याने नाशिकमध्ये भीतीने वातावरण निर्माण झाले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.