Nashik Crime : ‘जळालेल्या प्रेताची राख महिलेच्या अंगावर फेकली अन्…’ प्रियकरासोबत लग्नाचं आमिष दाखवून महिलेकडून पैसे उकळले; नाशिक हादरलं

नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्न जमवण्याचे आमिष दाखवून स्मशानात अघोरी पूजा करणाऱ्या भोंदूला अटक करण्यात आली आहे.
Nashik Crime : ‘जळालेल्या प्रेताची राख महिलेच्या अंगावर फेकली अन्…’ प्रियकरासोबत लग्नाचं आमिष दाखवून महिलेकडून पैसे उकळले; नाशिक हादरलं

नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्न जमवण्याचे आमिष दाखवून स्मशानात अघोरी पूजा करणाऱ्या भोंदूला अटक करण्यात आली आहे. प्रियकरासोबत लग्न जमवून देण्याचे आमिष दाखवत महिलेची फसवणूक केल्याचा आरोप या भोंदू बाबावर करण्यात आला होता. त्यानंतर विशाल खडांगळे असं या भोंदू बाबाचं नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार, नाशिकच्या अमरधाम स्मशानभूमीत मध्यरात्री अघोरी पूजा करण्याच्या बहाण्याने पीडित महिलेकडून 77 हजार रुपये उकळल्याचा आरोप केला असून पीडित महिला गुजरातमधील बलसाड येथून प्रियकरासोबत नाशिकमध्ये आली होती. प्रियकर जितू अण्णाराव पवार याच्यासोबत पीडित महिलेचे चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दरम्यान लग्नासाठी प्रियकराचा नकार असल्यामुळे भोंदू बाबाने लग्न जमवून देण्याचे आश्वासन पीडित महिलेला दिले. 

हेही वाचा- Accident: भरधाव ॲस्टन मार्टिनच्या धडकेत 26 वर्षीय तरुणीचा मृत्यू; खासदाराच्या 21 वर्षीय मुलाला अटक नाही

नाशिकच्या अमरधाम स्मशानभूमीत मध्यरात्री अघोरी पूजा करत असताना भोंदू बाबाने जळालेल्या प्रेताची राख, लिंबू आणि लाह्या महिलेच्या अंगावर फेकली. अघोरी पूजा करूनही लग्न न झाल्याने फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यानंतर महिलेने पैसे परत मागितल्यावर भोंदू बाबा आणि साथीदाराकडून दमदाटी व मारहाणीची धमकी देण्यात आल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. 

याप्रकरणानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीने संबंधित भोंदूबाबा आणि त्याच्या साथीदारांविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच जादूटोणाविरोधी कायदा आणि अन्य कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान भोंदू खडांगळे आणि त्याचा साथीदार जितू पवार दोघांनाही अटक करण्यात आली असून खरात प्रकरणानंतर नाशिकमधील भोंदूगिरीचा 12वा गुन्हा दाखल आहे. तर राज्यातील भोंदूगिरीच्या गुन्ह्यांपैकी सुमारे 15 टक्के गुन्हे नाशिकमध्ये असल्याचा दावा यावेळी करण्यात आला आहे. 
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version