प्रफुल खंडारे, प्रतिनिधी
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात गर्भलिंग निदान करून स्त्रीभ्रूणहत्या केली जात असल्याच्या आरोपावरून आरोग्य यंत्रणेत एकच खळबळ माजली आहे. खामगाव येथील अरबट सोनोग्राफी सेंटरवरून राजेश अरबट हे मोठ्या प्रमाणावर गर्भलिंग निदान करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यांच्याच सोनोग्राफी सेंटरवर काम करत असणाऱ्या कंपाउंडर ने हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आणला आहे. जय महाराष्ट्रने बातमी लावून धरल्यानंतर आरोग्य यंत्रणा खळबळून जागी झाली आहे. या प्रकरणात आता सहा ते सात डॉक्टरांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
कुणाकुणाला देण्यात आली नोटीस ?
1. डॉ. रवी साबे, वैरागड
2. डॉ. गौरव ठाकरे, खामगाव
3. डॉ. पांडुरंग हटकर, खामगाव
4. डॉ. जी. एस. मिसाळ जामोद
5. डॉ. उज्वला पाटील जळगाव जामोद
6. डॉ. मोहम्मद वसिम, अटाळी
7. डॉ. तब्बसुम हुसेन, खामगाव
तक्रारीत करण्यात आलेले आरोप तक्रारदार, त्याचा जबाब आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे या डॉक्टरांवर आता काय कारवाई होते, हेदेखील पहावं लागणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.