आव्हाडांची आमदारकी रद करण्याची मागणी

आव्हाडांची आमदारकी रद करण्याची मागणी

राजकरणात सातत्याने आरोप-प्रत्यारोप सुरूच असतात. परंतु एखाद्या राजकीय नेत्याने केलेले चुकीचे वक्तव्य त्याला चांगलेच भोवते. दरम्यान, राष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी सिंधी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी सिंधी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने सिंधी समाज चांगलाच पेटून उठला आहे. सिंधी समाजाबद्दल ‘सौ सिंधी कुत्ते’ असे आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ ठाण्यातील सिंधी समाज आक्रमक झाला आहे. या अनुषंगाने सिंधी समाजाच्या वतीने सोमवारी कोपरी ठाणे पूर्व मध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आला. तसेच, सिंधी समाजासह कोपरीतील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी कोपरी पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे. या निवेदनात आव्हाडांची ब्रेन मॅपिंग तसेच नार्को टेस्ट करून त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

त्यामुळे, आता या प्रकरणात सिंधी समाजाने केलेली मागणी पूर्ण होणार का? आव्हाडांची अंडरखी जाणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version