Kurla To Trombay Railway Line : कुर्ल्यात रेल्वेच्या वीजवाहिन्यांवर क्रेन कोसळली; दोन जण जखमी, घरांचंही नुकसान

Kurla To Trombay Railway Line : कुर्ल्यात रेल्वेच्या वीजवाहिन्यांवर क्रेन कोसळली; दोन जण जखमी, घरांचंही नुकसान

मुंबई : मुंबईतील कुर्ला येथील कुरेशी नगर भागात गुरुवारी रात्री उशिरा एक मोठी दुर्घटना घडली. इमारती पाडण्याच्या कामासाठी वापरली जाणारी एक अवजड क्रेन अचानक उलटली. अपघात घडला तेव्हा एका क्रेनच्या साहाय्याने ‘पोकलेन’ (Poclain) मशीन इमारतीच्या वरच्या भागाकडे उचलली जात होती. अचानक क्रेनचा तोल गेला आणि ती जमिनीवर कोसळली. तिचा काही भाग जवळच असलेल्या दोन घरांवर आणि मुंबई लोकल रेल्वेच्या वरून जाणाऱ्या विजेच्या तारांवर पडला. या अपघातात चार ते पाच जण जखमी झाले अजून त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून घटनास्थळी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक जमा झाले. दरम्यान, या घटनेमुळे रेल्वे वाहतुकीत सध्या कोणताही अडथळा नसल्याचे मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. असे असले तरी सध्या मध्य रेल्वे जवळपास २० मिनिट उशिराने धावत असून रेल्वे प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.

हेही वाचा : Today’s Horoscope 2026: आज सुख-समृद्धीचे संकेत! ‘या’ राशींचं नशीब उजळणार, पण 2 राशींसाठी दिवस ठरू शकतो आव्हानात्मक; वाचा संपूर्ण राशिभविष्य

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, त्या भागात एका जुन्या इमारतीचे पाडकाम सुरू होते. इमारतीच्या वरच्या भागावर ‘पोकलेन’ मशीन बसवण्याची तयारी केली जात होती. या प्रक्रियेत एका उच्च-क्षमतेच्या क्रेनचा वापर करण्यात आला होता. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, ती मशीन वर उचलली जात असताना क्रेनचा तोल अचानक गेला आणि ती संपूर्ण रचना उलटली. कोणाला काही प्रतिक्रिया देण्याची संधीही मिळाली नाही आणि डोळ्याचे पाते लवते न लवते तोच, क्रेनचा एक मोठा भाग जवळच्या घरांवर कोसळला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version