Latur Contractor News : नैराश्यातून कंत्राटदाराने संपवलं जीवन, 16 पानी नोटवर मांडली व्यथा; शासकीय अधिकाऱ्यांसह 11 जणांवर गुन्हा दाखल

Latur Contractor News : नैराश्यातून कंत्राटदाराने संपवलं जीवन, 16 पानी नोटवर मांडली व्यथा; शासकीय अधिकाऱ्यांसह 11 जणांवर गुन्हा दाखल

अजय घोडके, प्रतिनिधी 

लातूर : शासकीय कामांची बिले थकवल्याप्रकरणी गजानन देवकते यांची आत्महत्या ताजी असतानाच आता लातूर शहर महानगरपालिकेतील अधिकारी व उदगीरच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांनी कामाची बिले थकवल्याच्या नैराश्यातून लातूर महापालिकेच्या बांधकाम विभागात काम करणाऱ्या कंत्राटदाराने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. दयानंद हुल्ले (वय 50) असे मृत कंत्राटदाराचे नाव आहे. मृत्यूपूर्वी त्यांनी लिहिलेल्या 16 पानांच्या सुसाईड नोटवरून शासकीय अधिकाऱ्यांसह तब्बल 11 व्यक्तींवर उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा : Mumbai Accident: मालाडमध्ये भीषण अपघात; भरधाव कारची तब्बल 20 जणांना धडक, भाजप आमदाराच्या बहिणीचा दुर्दैवी मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, मुळचे उदगीर तालुक्यातील मौजे वायगाव येथील मृत दयानंद हुल्ले हे लातूर शहर महानगरपालिकेत बांधकाम विभागात कंत्राटदार म्हणून कार्यरत होते. मागील काही दिवसांपासून त्यांनी केलेल्या कामाची बिले लातूर महानगरपालिकेच्या बांधकाम विभागातील अधिकारी, उदगीरच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंते व गावातील काही लोकांकडून त्यांनी केलेले काम आणि दिलेले पैसे येणे बाकी होते. परंतु देणगीदारांनी त्यांना पैसे देण्याऐवजी त्यांना अनेक मार्गाने मानसिक त्रास दिला. त्यामुळे त्यांनी मृत्यूपूर्वी 16  पानांची सुसाईड नोट लिहून त्यांच्या मूळ गावी मौजे वायगावं (ता. उदगीर) येथे गळफास लावून आत्महत्या केली. त्यांचा मुलगा आदित्य दयानंद हुल्ले याने दिलेल्या तक्रारीवरून लातूर शहर महानगरपालिकेच्या बांधकाम विभागातील अभियंता नवनाथ केंद्रे, उदगीरच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील मीना सर, लातूरातील सामाजिक संघटनेचे विनय जाकते, आसिफ काझी, किरण पायाळ, निखिल जांभळे, लोंढे, घनश्याम मोरे, हरिभाऊ भगत, गणेश हॉटेलचे मालक, रहीम भाई यांच्यासह 11 व्यक्तींवर उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात मागतेस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version