छोटीशी चुक देखील महागात पडू शकते. आपल्या लहान मुलांकडे पालकांनी डोळ्यात तेल घालून लक्ष देण्याची गरज आहे. नवी मुंबईत एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. उरणमधील द्रोणागिरी नोड येथील स्काय व्हिला या इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून पडून शिवांश चव्हाण या तीन वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. शिवांशचे आई – वडील सामान शिफ्ट करत असताना तो बाल्कनीत गेला. ग्रीलमधून खाली बघत असताना तो खाली पडला. याबाबत पालकांना माहिती मिळाली असता त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, परंतु त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
रुग्णालयातच शिवांशच्या आईने टाहो फोडला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. छोटीशी चुक देखील महागात पडू शकते. आपल्या लहान मुलांकडे पालकांनी डोळ्यात तेल घालून लक्ष देण्याची गरज आहे. मुलांकडे थोडे जरी दुर्लक्ष केले तरी किती मोठी दुर्घटना होऊ शकते हे स्पष्ट झाले. ३ वर्षाचं लेकरु १२ व्या मजल्यावरून खाली पडलं तरी त्याच्या आई वडिलांना कळाले नाही. या घटनेत या चिमुरड्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.