Nashik Crime : इगतपुरीतील पर्यटकांवर जीवघेणा हल्ला, 9 जण ताब्यात; एका आरोपीवर यापूर्वीच खुनाचा गुन्हा दाखल

Nashik Crime : इगतपुरीतील पर्यटकांवर जीवघेणा हल्ला, 9 जण ताब्यात; एका आरोपीवर यापूर्वीच खुनाचा गुन्हा दाखल

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पर्यटन बिंदू असलेल्या भावली धरण आणि धबधबा परिसरात पर्यटनासाठी गेलेल्या एका कुटुंबावर टवाळखोरांच्या टोळीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली होती. शहरातील रहिवासी असलेल्या पुनम भागवत या रविवारी आपल्या कुटुंबातील 8 सदस्यांसह भावली धरणावर फिरण्यासाठी गेल्या होत्या. फिरून झाल्यानंतर घरी जाण्यासाठी निघाले असता दोन टवाळखोरांनी भागवत यांच्या कुटुंबातील एका महिलेची छेड काढली. त्यानंतर 8 ते 10 किलोमीटर पुढे त्यांचा थरारक पाठलाग करत त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. याप्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई केली असून नऊ आरोपीना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी एकावर यापूर्वीच खूनचा आरोप झाल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा : Byculla poisonous capsule case: भायखळा विषारी कॅप्सूल प्रकरणाला आंतरराष्ट्रीय वळण; आरोपी फैयाजच्या मोबाईलमध्ये सापडले इराण-इराकशी संशयास्पद कनेक्शन

नाशिकचे एस. पी डी. एस स्वामी यांनी याबाबत सांगितले की, भावली धरण येथे जी घटना घडली होती, त्याअनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला होता. महिला विनय भंग, गाडीची काच फोडणे,हल्ला करणे, विनय भंग, attempt to murder सारखा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इगतपुरी, नांदगाव सदो, माणिक खांब इतर परिसरात हे आरोपी असून आतापर्यंत 9 आरोपी अटक करण्यात आले आहे. या प्रकरणातील सर्व आरोपी निष्पन्न झाले असून यामधील एक आरोपी भोईर नामक याच्यावर यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात कडक कलम लाऊन पर्यटनावर परिणाम होणार नाही, अशी कडक कारवाई केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version