Karad News : कराडमध्ये लग्नाच्या जेवणातून 70 लोकांना विषबाधा, रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता; FDA अलर्ट मोडवर

कराडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नातील जेवण खाल्ल्यानंतर तब्बल 70 लोकांना विषबाधा झाली आहे. ही घटना कराड येथील पाटण तालुक्यातील मंद्रूळ हवेली गावातून समोर आली आहे.
Karad News : कराडमध्ये लग्नाच्या जेवणातून 70 लोकांना विषबाधा, रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता; FDA अलर्ट मोडवर

कराडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नातील जेवण खाल्ल्यानंतर तब्बल 70 लोकांना विषबाधा झाली आहे. ही घटना कराड येथील पाटण तालुक्यातील मंद्रूळ हवेली गावातून समोर आली आहे.  कराड येथील पाटण तालुक्यात एका लग्न समारंभातील जेवणातून सुमारे 70 जणांना अन्नविषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. 

हेही वाचा- Nagpur FDA Raid: सूपमध्ये झुरळ, फ्रिज उघडून पाहिल तर…, नागपूरच्या रेस्टॉरंटमध्ये अन्नसुरक्षेचा बोजवारा; FDA कडून थेट लायसन्स सस्पेंड

यावेळी 800ते 1000 लोकांनी जेवण केले होते, त्यामुळे रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तावण्यात येत आहे. दरम्यान जेवण केल्यानंतर अनेकांना उलट्या, जुलाब, पोटदुखी आणि मळमळ यांसारखी लक्षणे जाणवू लागल्याने त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सर्व रुग्णांवर तत्काळ उपचार सुरू केले आहे.

या घटनेनंतर अन्न व औषध प्रशासनाकडून खाद्यपदार्थाचे सॅम्पल तपासणीसाठी पाठविण्यात आले असून विषबाधेचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. बाधीत सर्व जण प्राथमिक आरोग्यकेंद्र मल्हारपेठ या ठिकाणी दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून अन्न तयार करताना आणि वाढताना स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version