Mumbai Accident : मुंबईत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात! 6 वाहनं एकमेकांवर आदळली, अनेक जण जखमी

मुंबईत 6 वाहनांचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबईच्या बोरीवली पूर्व येथील मागाठाणे परिसरात ही घटना घडल्याचे समोर आले आहे.
Mumbai Accident : मुंबईत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात! 6 वाहनं एकमेकांवर आदळली, अनेक जण जखमी

मुंबईत 6 वाहनांचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबईच्या बोरीवली पूर्व येथील मागाठाणे परिसरात ही घटना घडल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरीवली पूर्व येथील मागाठाणे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर 6 वाहने एकमेकांवर आदळल्या ज्यामुळे मोठी दुर्घटना झाली. यात 5 कार आणि 1 बस या वाहनांचा समावेश असून अशा एकूण 6 गाड्या एकमेकांना धडकल्या. या अपघात काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा- Virar Accident : विरारमध्ये मोठी दुर्घटना! अर्नाळा समुद्रात 4 मुलं लाटांमध्ये वाहून गेली, परिसरात खळबळ

सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान अपघातानंतर वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिस आणि संबंधित यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आल्यानंतर हळूहळू वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. दरम्यान अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. 
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version